नवी दिल्ली - सध्याची पिढी लय फास्ट आहे, असं आपण नेहमीच ऐकतो किंवा चर्चेत बोलतोही. या वाक्याचा नेहमीच आपल्याला प्रत्यय येतो, कधी मोबाईल एक्सपर्ट चिमकुला किंवा कार ड्रायव्हींग करणारा लहान मुलगा पाहून आपल्याला आश्चर्य वाटते. मात्र, आता चक्क जेसीबी चालविण्याचा पराक्रम एका चिमुकल्यानं केला आहे. एका ऑपरेटरप्रमाणे 5 वर्षीय लहानग्याने जेसीबी चालवला असून टीम इंडियाचा माजी फलंदजा विरेंद्र सेहवागनेही आश्चर्य व्यक्त केले आहे.
टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबतच, या चिमकुल्याच्या जेसीबी चालविण्याचं कौतुकही केलं आहे. सेहवागने शेअर केलेल्या व्हिडिओत, एक चिमुकला जेसीबी चालवताना दिसत असून या चिमुकल्याचा छोटेखानी इंटरव्यूव्ह एका व्यक्तीकडून घेण्यात येत असल्याचे दिसून येते. या मुलाखतीतील व्यक्ती सांगते की, इयत्ता पहिलीमध्ये शिकणारा हा पोरगा जेसीबी चालविण्यात एक्सपर्ट आहे. विशेष म्हणजे या चिमुकल्यास जेसीबी चालविण्याचा आग्रह केल्यानंतर तो लहान मुलगा उत्कृष्टपणे जेसीबी चालविताना दिसून येत आहे. त्यामध्ये माती उचलण्याचं, मिशन पुढे-मागे करण्याचं कामही या चिमुकल्याकडून होताना दिसत आहे.
सेहवागने आपल्या ट्विटरवरुन हा व्हिडिओ शेअर करत, टॅलेंट आणि आत्मविश्वास हेच हा व्हिडिओ शेअर करण्यामागचा उद्देश असल्याचे सेहवागने म्हटलंय. तसेच, जेसीबीकडून सुरु असलेलं खोदकाम पाहून तुम्हीही जागेवर थांबला असाल, तेथे जाऊन गर्दी केली असेल, पण यापेक्षा जबरदस्त काहीच पाहिलं नाही आजातागायत, असेही सेहवाग म्हणाला. तसेच, तुम्ही एखादा विचार केलात तर तुम्ही ते करु शकता किंवा करु शकत नाही, तुमचं बरोबर आहे. मी कुणालाही अशाप्रकारे जेसीबी चालविण्याचं सूचवत नसून केवळ कौतुक म्हणून हा व्हिडिओ शेअर केल्याचं सेहवागने म्हटले आहे.