लोकसभा निवडणुकीदरम्यान, कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार राजू केज हे जुगलतोमध्ये मतदारांना धमकावताना व्हिडिओमध्ये दिसल्याने वादात सापडले आहेत. जर पक्षाला मोठ्या मताधिक्याने मतदान केलं नाही तर वीज कापली जाईल असं त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा प्रचार करत असताना त्यांनी असं म्हटलं आहे.
काँग्रेसचे आमदार राजू केज या व्हिडिओमध्ये "तुम्ही आम्हाला मत न दिल्यास आम्ही वीज खंडित करू आणि मी माझ्या शब्दांवर ठाम राहीन" असं म्हणताना दिसत आहेत. केज यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांचा हा व्हि़डीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून अनेक जण त्यावर टीका करत आहेत.
"140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात कोणीही पंतप्रधान होणार नाही का? आजचा तरुण म्हणतो, मोदी म्हणजे मोदी आहेत. तुम्ही त्यांच्या मागे का जात आहात?" असा सवाल देखील विचारला होता. याआधी ममदापूरमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना केज यांनी पंतप्रधान मोदींवर आलिशान जीवन जगत असल्याचा आरोप केला होता.
काँग्रेस आमदारांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना, भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. हा पक्ष 'मोहब्बत की दुकान' नाही आणि खरं तर 'धमकी के भाईजान' आहे. तसेच भाजपाने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचाही संदर्भ दिला.