Video - भयंकर! मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील खासगी रुग्णालयात भीषण आग; १० जणांचा होरपळून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 04:46 PM2022-08-01T16:46:40+5:302022-08-01T17:01:29+5:30

Fire News : आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तसेच रुग्णालयात असलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे. 

Video madhya pradesh massive fire breaks out private hospital jabalpur people death incident | Video - भयंकर! मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील खासगी रुग्णालयात भीषण आग; १० जणांचा होरपळून मृत्यू 

Video - भयंकर! मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील खासगी रुग्णालयात भीषण आग; १० जणांचा होरपळून मृत्यू 

googlenewsNext

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. जबलपूरमधील एका खासगी रुग्णालयात भीषण आग लागली असून यामध्ये आतापर्यंत १० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तसेच रुग्णालयात असलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दमोह नाका शिवनगर येथील न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी या एका खासगी रुग्णालयात भीषण आग लागली आहे. आग लागल्याचं समजताच रुग्णालयाच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. आगीची भीषणता पाहून हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने मदत कार्य सुरू आहे. आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर मृतांमध्ये रुग्णालयातील कर्मचारांचा देखील समावेश आहे. रुग्णालयात भरती असलेल्या अनेक रुग्णांना उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील या दुर्घटनेबाबत ट्विट केलं आहे. तसेच या आगीत जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत केली जाईल असं म्हटलं आहे. 

Web Title: Video madhya pradesh massive fire breaks out private hospital jabalpur people death incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.