बदायूं : उत्तर प्रदेशमधील बदायूंमधील एका सरकारी रुग्णालयातील असंवेदनशीलतेचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाने शव वाहिनी न दिल्यामुळं पतीला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन घरी जावे लागले.
काल सोमवारी उत्तर प्रदेशमधील बदायूंमधील जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. रुग्णालयाकडे दोन शव वाहिका होत्या पण प्रशासनाने देण्यास नकार दिला. सोमवारी मूसाझाग भागात राहाण्याऱ्या व्यक्तीने आजारी असणाऱ्या पत्नीला बदायूंतील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूपूर्वीच त्या वक्तीने रुग्णालयाच्या मुख्य चिकित्सा अधिक्षकांना पत्र लिहून शव वाहिनीची मागणी केली होती. पण गरीब असलेल्या या वक्तीला रुग्णालयाने शव वाहिका नाकारली.
धक्कादायक गोष्ट म्हणजे रुग्णालयाबाहेर दोन शव वाहिका उभ्या होत्या. तरीही रूग्णालय प्रशासनाने त्या व्यक्तीला शव वाहिका देण्यास नकार दिला. माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयावर टीका होत आहे. प्रकरणानंतर प्रशासनाने चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. दोषींवर कारवाई करण्यात येईल असे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.