ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची उत्तरप्रदेशातील 'खाट सभा' राहुल यांच्या भाषणापेक्षा खाटेच्या पळवापळवीमुळे जास्त चर्चेत राहिली. राहुल यांचे भाषण संपताच जमलेल्या गर्दीने खाटांची एकच पळवापळवी सुरु केली.
उत्तरप्रदेशातील देवरीयामध्ये राहुल यांनी खाट सभेच्या माध्यमातून शेतक-यांशी संवाद साधला. राहुल यांनी कर्जमाफीचे आणि वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याचे आश्वासन दिले. राहुल यांचे भाषण संपताच जमलेल्या गर्दीमध्ये एकच गोंधळ सुरु झाला.
खाटा घरी घेऊन जाण्यासाठी श्रोत्यांमध्ये वादावादी सुरु झाली. जो तो मिळेल ती खाट घेऊन पळत असल्याचे सभास्थळी चित्र होते. सभास्थळी जवळपास २ हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. ही खाट सभा उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेसच्या रणनितीचा भाग होती. काँग्रेस उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुक पूर्ण ताकदीनिशी लढवत आहे.
WATCH: Chaos breaks out as locals fight for Khatiyas(wooden cots) after Rahul Gandhi's Khat Sabha in Deoria ends pic.twitter.com/4tUxP81L1w— ANI UP (@ANINewsUP) September 6, 2016