अहमदाबाद - गुजरातमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची जादू चालली होती. एकप्रकारे त्यांची लाटच आली होती. मोंदीच्या लाटेमुळे भाजपानं केंद्रात एकहाती सत्ता मिळवली होती. त्यानंतर महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश यासारख्या राज्यामध्ये भाजपा सत्तेत आली. पण सध्या गुजरातमध्ये नरेंद्र मोदीं यांची लाट ओसरल्याचे दिसत आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी भाजपासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जसदणमध्ये एक रॅली आयोजित करण्यात आली होती. मिळालेल्या वृत्ताननुसार, त्यांच्या या सभेसाठी 1200 खुर्च्यांची सोय करण्यात आली होती. मात्र त्यातील फक्त 400 खुर्च्यांवर लोक बसले होते आणि 800 खुर्च्या खाली होत्या.
( आणखी वाचा - हो मी चहा विकला, पण देश नाही विकला - नरेंद्र मोदी )
द क्विंटने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरु होण्यापूर्वी तेथील काही भाग खाली होता. ज्या ठिकाणी रॅली आणि सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या क्षेत्रामध्ये विधानसभेच्या पाच जागेवरील (जसदण, चोटिला, राजकोट देहात, जूनागढ आणि गधादा) भाजापाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ज्यांच्याजवळ तंबाखू, बिडी, सिगारेट आणि माचिस बॉक्स यासारख्या गोष्टी असणाऱ्या लोकांना सभेमध्ये येण्यास मनाई केल्यामुळे खुर्च्या खाली होत्या असे भाजपा नेता डॉक्टर बोगरा यांना सांगितले.
दरम्यान, सभेतील खाली खुर्च्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटीझन्स त्यावर समिंश्र प्रतिक्रिया देत आहेत.