ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - केंद्र आणि राज्याच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरून लाल दिवा कायमचा हद्दपार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने एक मे रोजी लागू केला होता. पण मोदींनी घेतलेल्या या निर्णयला मध्यप्रदेशमधील गृहमंत्र्यांनी ठेंगा दाखवला आहे. मध्यप्रदेशमधील सांरगपूरमध्ये गृहमंत्री उमाशंकर गुप्ता एका ट्रॅफ्रिक जॅममध्ये फसले होते. हा जाम चक्क पाच कि.मीचा होता. मंत्रीमहोदयांना एका कार्यक्रमाला जाण्यासाठी उशीर होत होता. त्यावेळी त्यांनी पोलिसांना जाण्यासाठी रस्ता खाली करण्याचे आदेश दिले.
गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांच्या या आदेशानंतर पोलिसांनी रस्ता खाली करण्यास सुरुवात केली. त्यांना जाण्यासाठी पाच किमीचा रस्ता पुर्णपणे जॅम झाला होता. मंत्रीमहोदय त्या जॅममधून बाहेर पडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते. त्याचवेळी जॅममधून हळूहळू पुढे सरकणारी वाहणे जागीच थांबली. गाडीचा सायरन वाजवत गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांच्या वाहनाचा ताफा पुढे सरकत होता. गृहमंत्र्यांचा ताफा बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी पाच किमीच्या रसत्यावरुन एकाही वाहनाला जाग्यावरुन हलू दिलं नाही.
गृहमंत्री उमाशंकर गुप्ता राष्ट्रीय हायवे क्रमांक तीन वरुन जात असताना हा ट्रॅफीक जॅम लागला होता. मंत्री जोपर्यंत ट्रॅफीक जॅमधून बाहेर निघत नाहीत तोपर्यंत बाईक, कार, साइकल, ट्रक सारखी वाहने रसत्याच्या एका बाजूला उभे होती. दरम्यान, गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांनी हा जॅम का झाला आहे? हे विचारण्यासही विसरले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मन की बात" कार्यक्रमाच्या 31 व्या भागातून लाल दिव्याप्रति लोकांच्या असलेल्या रागाला वाट मोकळी करून दिली. केंद्र सरकारनं लाल दिवा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आता याचा लाभ घेणा-यांनी गाडीतूनच नव्हे, तर मनातूनही लाल दिव्याचा मोह काढून टाकावा. देशात VIP कल्चरचा द्वेष केला जातो. मात्र तो द्वेष एवढा खोलवर गेल्याचा मला आताच अनुभव झाला. न्यू इंडियात आता व्हीआयपीच्या ऐवजी EPI (Every Person is Important) वर भर देण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांनाही आत्मचिंतनाचा सल्ला दिला आहे.