नागालँडमधील दीमापूर जिल्ह्यात मंगळवारी एक दुर्दैवी घटना घडली. येथील जुन्या चेक पोस्ट चुमुकेदिमा जवळ एका डोंगरावरून एक विशाल शिळा कोसळली. माध्यमांतील वृत्तांनुसार, या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. यात अनेक प्रवाशांची वाहने दगडांखाली दबले आहेत.
यासंदर्भात, नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे की, "आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास दीमापूर आणि कोहिमादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर शिळा कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित ठिकाणी नेहमीच भूस्खलन होते आणि शिळाही कोसळत असतात. मी मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. तसेच जखमी लवकरात लवकर ठणठणीत व्हावेत यासाठी प्रार्थना करतो."
याशिवाय, राज्य सरकार आपातकालीन सेवा देत, मृतांच्या कुटुंबीयांना 4-4 लाख रुपयांची नुकसान भरपाई देणार आहेत. तसेच, जखमींना आवश्यक असलेली वैद्यकीय मदत आणि सहाय्य प्रदान करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलेल.