पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील निवडणूक रॅलीतील भाषण थांबवून लोकांना टॉवरवरून खाली येण्याची विनंती केली. टॉवरवर चढणाऱ्या लोकांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि टॉवरवरून खाली पडू शकतात असं सांगितलं. "मला माहीत आहे की तुम्ही लोक मला पाहू शकणार नाही, परंतु कोणी पडलं तर मला खूप दुःख होईल" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. रॅलीसाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते.
तेलंगणातील निर्मल येथील रॅलीत पंतप्रधानांच्या विनंतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. काही आठवड्यांपूर्वीही त्यांनी हैदराबादमधील एका निवडणूक रॅलीत आपले भाषण थांबवले होते आणि एका महिलेला टॉवरवरून खाली उतरण्यास सांगितले होते. यावेळी "जे लोक टॉवरवर चढले आहे, त्यांना मी खाली येण्याची विनंती करतो. इथे खूप गर्दी आहे. मला समजतं की तुम्ही मला पाहू शकणार नाही, पण जर कोणी पडले तर मला खूप दुःख होईल. प्लीज खाली या."
"मला तुमच्या प्रेमाची कदर आहे, पण कृपया खाली या. तुम्हाला इजा होऊ शकते. इथे एवढी गर्दी आहे की तुम्ही मला पाहू शकणार नाही. याबद्दल मी माफी मागतो, पण माझ्या हृदयाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल याची खात्री आहे" असं मोदींनी म्हटलं आहे. गर्दीमध्ये तिरंगा फडकवणाऱ्या एका चिमुकलीचाही त्यांनी उल्लेख केला. "आज ती भारत माता बनून आली आहे. शाब्बास" असंही म्हटलं.
11 नोव्हेंबर रोजी, पंतप्रधानांना हैदराबादमध्ये ट़ॉवरवर असलेल्या एका तरुणीला खाली ये असं सांगण्यासाठी भाषण थांबवावं लागलं. पंतप्रधानांनी मुलीला वारंवार खाली येण्याची विनंती केली आणि विजेच्या तारांजवळ वीज पडण्याचा धोका असल्याचे सांगितले. जेव्हा ती मोदींना काही सांगण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा ते म्हणाले की, "बेटा, मी तुझे ऐकतो. कृपया खाली येऊन बस. शॉर्ट सर्किट होऊ शकतं. हे बरोबर नाही. मी तुमच्यासाठी आहे आलोय."