पटना: बिहारचे माजी मुख्यमंत्री डॅा. जगन्नाथ मिश्र यांचा बुधवारी सुपौल जिल्ह्यात शासकीय इतमामात अंतिमसंस्कार पार पडला. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मात्र अंतिमसंस्कारवेळी राज्याचे मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांसमोरच बिहार पोलिसांची गडबड झाल्याचे समोर आले आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री डॅा. जगन्नाथ मिश्र यांच्या अंत्यसंस्कार वेळी 21 बंदुकांची सलामी देण्यात होणार होती. परंतु सलामी देत असताना पोलिसांच्या बंदुकीतीन एकही गोळी उडालीच नाही. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक विरोधी नेत्यांसोरच बिहार राज्यातील पोलिस प्रशासनचा कारभार समोर आला. या प्रकरणानंतर सुपौलचे पोलिस अधिक्षक मृत्युंजय चौधरी यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
जगन्नाथ मिश्रा यांनी तीन वेळा बिहार राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. 1975 साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि एप्रिल 1977 पर्यत पद सांभाळले होते. यानंतर 1980मध्ये त्यांनी पुन्हा तीन वर्षाचा कारभार सांभाळला होता. तसेच 1989मध्ये तिसऱ्यांदा तीन महिन्यांचा मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळला होता.