नवी दिल्ली : दहशतवाद्यांना सीमेपलिकडून घुसखोरी करण्यासाठी मदत करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारताना आज चांगलाच धडा शिकवला. कुपवाडामध्ये पाकिस्तानी सैन्याच्या बंकरांवर थेट रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रेच डागण्यात आली. याचा व्हिडीओ एएऩआय या वृत्तसंस्थेने जारी केला आहे.
पाकिस्तानकडून कुपवाडामध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले. वारंवार होणाऱ्या या गोळीबाराला आज भारतीय जवानांनी थेट क्षेपणास्त्रच डागून प्रत्यूत्तर दिले. उंचावर चौक्या उभारून पाकिस्तानचे सैनिक गोळीबार करतात. यामुळे भारतीय जवान बचाव करण्यासाठी आणि प्रत्यूत्तर देण्यामध्ये व्यस्त असतात. याचाच फायदा दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी होतो. यामुळे पाकिस्तानकडून नेहमी गोळीबार केला जातो. यास आज चक्क रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राने उत्तर देण्य़ात आले.
गेल्या काही काळापासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन वाढले आहे.जम्मू काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तान शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करते. पण त्यांने मनसुबे भारतीय जवान उधळून लावत आहेत. काश्मीरमधील युवकांना दहशतवादाकडे वळविण्यासाठी या संघटना मोहिमा राबवत आहेत. मात्र, भारत सरकार तरुणांना परावृत्त करत असल्याने हे प्रमाण कमी होत आहे.