Video : चालत्या गाड्यांसमोर लोकांचा डान्स, 'Nillu Nillu Challenge'ने उडवलीय पोलिसांची झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 12:56 PM2018-11-27T12:56:01+5:302018-11-27T12:57:02+5:30

Nillu Nillu Challenge : किकी चॅलेंजनंतर आता Nillu Nillu साँग चॅलेंजनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Video: People dance in front of running trains, 'Nillu Nillu Challenge' sleeping policeman sleeping | Video : चालत्या गाड्यांसमोर लोकांचा डान्स, 'Nillu Nillu Challenge'ने उडवलीय पोलिसांची झोप

Video : चालत्या गाड्यांसमोर लोकांचा डान्स, 'Nillu Nillu Challenge'ने उडवलीय पोलिसांची झोप

Next

किकी चॅलेंजनंतर आता Nillu Nillu साँग चॅलेंजनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 2004मध्ये रिलीज झालेल्या 'Rain Rain Come Again' मधील गाण्याचा या चॅलेंजमध्ये वापर करण्यात आला आहे. या चित्रविचित्र चॅलेंजमध्ये लोक चालत्या गाडीसमोर येऊन Nillu Nillu गाण्यावरुन डान्स करताहेत. केरळच्या गल्लीबोळ्यात 'Nillu Nillu साँग' चॅलेंजनं सध्या धुमाकूळ घातला आहे. पण जीवघेण्या या चॅलेंजमुळे पोलिसांची झोप उडवली आहे. हे चॅलेंज रोखणे पोलिसांसाठी आव्हान ठरते आहे. चालत्या गाड्यांसमोर येऊन Nillu Nillu साँग चॅलेंज करू नका, असे आवाहन पोलीस सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना करत आहेत. 

या चॅलेंजमध्ये मुलांचा घोळका चालत्या गाडीसमोर येतो आणि Nillu Nillu गाण्यावर डान्स करू लागतात. एवढंच नाही तर डोक्यावर हेल्मेट आणि हातात झाडांच्या फांद्या घेऊन मुलं चित्रविचित्र नाचू लागतात. यानंतर चॅलेंजचा व्हिडीओ टिक-टॉक (Tik Tok) अॅपवर शेअर केला जातो. 

काय आहे 'Nillu Nillu साँग चॅलेंज'?
सर्वात आधी मुलं रस्त्याच्या मधोमध येऊन चालत्या गाडीला थांबवतात. डोक्यावर हेल्मेट आणि हातात झाडांच्या फांद्या हातात घेऊन गाडीसमोर 'Nillu Nillu' गाण्यावर मुलं साऊथ इंडियन स्टाइलनं डान्स करू लागतात. दरम्यान, हे चॅलेंज इतकं प्रसिद्ध झालंय की, विष्णु उन्नीकृष्णन सारख्या स्टारनंही हे चॅलेंज स्वीकारले होते. पण या चॅलेंजमुळे पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत. दिसायला हे व्हिडीओ फार गमतीशीर वाटतात, पण हे चॅलेंज जीवघेणे ठरू शकते. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क करण्याचे काम पोलीस करताहेत. 

Web Title: Video: People dance in front of running trains, 'Nillu Nillu Challenge' sleeping policeman sleeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.