बिहार - बिहारमधील सिवान येथे पोलीस अधिकाऱ्याकडून घडलेल्या क्षुल्लक चुकीमुळे त्याला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे हे सिवान येथील रुग्णालयाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. त्यातच हा गोंधळ उडाला. पोलीस ताफ्यातील एक पोलीस अधिकाऱ्याने मंगल पांडे यांना ओळखले नाही. अधिकाऱ्याने त्यांच्याकडे पाहून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोग्य मंत्री यांचा संताप अनावर झाला आणि त्याने थेट त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे निलंबनाची मागणी केली आहे.
बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांची ओळख न पटल्याने सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या ताफ्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने इतरांच्या चौकशीदरम्यान त्यांची देखील चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अगोदरच त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने परिस्थिती सांभाळून घेतली आणि संतापलेल्या पांडे यांना शांत केले. त्यामुळे मंत्री पांडे यांची चौकशी झाली नाही. मात्र, या घडलेल्या प्रकारमुळे मंत्री साहेबाचा राग अनावर झाला होता. नंतर त्यांनी थेट त्या पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणीच केली.