नवी दिल्ली - देशातील ग्रामीण भागांत आजही अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती आहे. पक्का रस्ता, मुलभूत सुविधा नसल्याने तेथील लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच एक घटना छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यात घडली आहे. कावड करून गर्भवती महिलेला टोपलीत बसवून रुग्णालयात नेल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गावात पक्के रस्ते नसल्याने आरोग्य सेवा वेळेवर पोहोचू शकत नाही.
रुग्णवाहिका नसल्याने गर्भवती महिलेला नदी पार करून काही गावकऱ्यांनी रुग्णालयात नेल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कडनाई गावातील महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. मात्र रस्त्यांअभावी गावापर्यंत रुग्णवाहिका येऊ शकत नव्हती. त्यामुळे गावकऱ्यांनी कावड केली आणि महिलेला टोपलीत बसवून नेले.
गर्भवतीला रुग्णालयात नेण्यासाठी गावकऱ्यांना नदी पार करावी लागली आहे. सेवा आणि सुविधा नसल्यामुळे छत्तीसगडमधील अनेक गावं आजही आरोग्य सेवेपासून वंचित राहिली आहेत. याआधीही अशाच घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बिजापूरमध्येही अशीच घटना समोर आली होती. गर्भवतीला एका मोठ्या भांड्यातून नदी पार करत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"राम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींचं कोणतंही योगदान नाही तर..." भाजपा खासदाराचा घरचा आहेर
धक्कादायक! पंजाबमध्ये विषारी दारूने घेतला 86 जणांचा बळी; 25 जणांना अटक
मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; कलर TV आयात करण्यास बंदी
TikTok चे अच्छे दिन संपले? लवकरच होणार व्हिडिओ शेअरिंग अॅपचा लिलाव
काय सांगता? ...म्हणून 50 वर्षांपासून 'या' गावात बहिणीने भावाला बांधली नाही राखी
Sushant Singh Rajput Suicide : "रिया म्हणजे 'विषकन्या', सुशांतच्या मृत्यूला 'गँग' जबाबदार"