काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज राजधानी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर हमालांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी काही प्रवाशांचे सामानही उचलले. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. काँग्रेस पक्षाने राहुल गांधी आणि हमाल यांच्या भेटीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. सध्या या भेटीची जोरदार चर्चा होत आहे.
फोटो शेअर करताना काँग्रेस पक्षाने "लोकनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशनवर हमाल सहकाऱ्यांना भेटले. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये रेल्वे स्टेशनच्या हमाल सहकाऱ्यांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज राहुलजी त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकलं. भारत जोडो यात्रा सुरूच आहे."
राहुल गांधी गेल्या काही काळापासून सातत्याने लोकांना भेटत आहेत. यापूर्वी त्यांनी हरियाणात ट्रॅक्टर चालवून शेतकऱ्यांसोबत शेतात काम केलं होतं. यानंतर त्यांनी मोटार मेकॅनिकचीही भेट घेतली. राहुल गांधी दिल्लीतील करोलबागमध्ये मोटरसायकल मेकॅनिकशी बोलताना दिसले.
या भेटीचे अनेक फोटोही राहुल गांधींनी शेअर केले होते. मेकॅनिकशी झालेल्या संवादात राहुल गांधींनी त्यांच्या बाईकचाही उल्लेख केला होता. व्हिडिओमध्ये राहुल गांधींनी माझ्याकडे KTM 390 बाईकही आहे. पण ती उभी आहे. सुरक्षारक्षक मला गाडी चालवू देत नाहीत असं म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.