काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. २१ ऑगस्ट रोजी राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले, जिथे त्यांनी काश्मीरमधील काही तरुण विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी राहुल गांधींना लग्नाशी संबंधित प्रश्न विचारले, त्यावर त्यांनी हलक्याफुलक्या अंदाजात उत्तर दिलं. या मजेदार क्षणाचा व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे आणि सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
दहा मिनिटांच्या या संभाषणात राहुल गांधींनी काश्मिरी विद्यार्थ्यांशी काश्मीरच्या भविष्यापासून मुलींच्या रोजगाराच्या संधींपर्यंत प्रत्येक विषयावर चर्चा केली. यावेळी एका विद्यार्थिनीने त्यांना लग्नाशी संबंधित प्रश्न विचारला. विद्यार्थिनीने विचारलं, "राहुलजी, तुम्ही लग्न कधी करणार आहात?" या प्रश्नाला राहुल गांधींनी हसत उत्तर दिलं. संवादाचा हा भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला.
एका काश्मिरी विद्यार्थिनीसोबतच्या लग्नाशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, सध्या याबाबत कोणतंही प्लॅनिंग नाही. तसं झालं तर ठीक आहे. गेल्या २०-३० वर्षांपासून लग्न करण्याच्या या दबावातून मी आता बाहेर आलो आहे. या संभाषणात एकाने राहुल गांधींना सांगितलं की, तुम्ही जेव्हाही हे कराल तेव्हा तुम्ही आम्हाला लग्नाचे निमंत्रण नक्की द्या.
राहुल गांधींना त्यांच्या लग्नाशी संबंधित प्रश्नांना वेगळे सामोरे जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. प्रत्येक वेळी त्यांची वेगवेगळी उत्तरं असतात. सध्या मी पक्षाच्या कामात पूर्णपणे मग्न आहे असंही याआधी म्हटलं होतं. गेल्या वर्षी जूनमध्येही राहुल गांधींच्या लग्नाच्या प्रश्नाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड झाला होता.
राहुल गांधींना लालू प्रसाद यादव यांच्याकडूनही हा प्रश्न विचारण्यात आला होता. पाटणा येथे विरोधी पक्षांच्या सभेत लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधींना लग्न करण्याची विनंतीही केली होती. लालू प्रसाद यादव म्हणाले की, लग्न करा, आम्ही लग्नाच्या वरातीत येऊ. काँग्रेस नेत्याने हसून उत्तर दिलं होतं की, आता तुम्ही सांगितलं आहे तर ते होईल.