नवी दिल्ली :काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या घराचा पत्ता बदलणार आहेत. त्यांना लवकरच राजधानी दिल्लीत नवा बंगला दिला जाणार आहे. दरम्यान, शुक्रवारी(दि.26) काँग्रेस महासचिव आणि राहुल यांची बहीण प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आपल्या भावाच्या नवीन बंगल्याची पाहणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल यांना सुनेरी बागेत बंगला क्रमांक 5 देण्यात आला आहे. यापूर्वी राहुल गांधी यांचे अधिकृत निवासस्थान 12 तुघलक लेन, नवी दिल्ली होते.
लोकसभा सदस्यत्व गमावल्याने बंगला सोडावा लागलागेल्या वर्षी मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते, त्यामुळे त्यांना आपल्या 12 तुघलक लेन येथील बंगला रिकामा करावा लागला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले. सदस्यत्व बहाल केल्यानंतर त्यांना पुन्हा बंगला परत देण्यात आला. मात्र, त्यांनी तो बंगला घेण्यास नकार देत, आई सोनिया गंधा यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.
प्रियांका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार सध्या राहुल गांधी 10 जनपथ येथील बंगल्यात राहत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी वायनाड आणि रायबरेली, या दोन लोकसभा जागांवरुन निवडणूक लढवली होती. दोन्ही जागांवर ते विजयी झाले. मात्र, त्यांनी वायनाडची जागा आपल्या बहिणीसाठी सोडली. आता वायनाडमधून प्रियांका गांधी पोटनिवडणूक लढवणार आहेत.