गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध शहरांतील लोकांना वंदे भारत या प्रमियम एक्स्प्रेस सेवेचे गिफ्ट देत आहेत. परंतू, लोकसभा निवडणुकीपर्यंत मोठे वंदे भारत बनविणाऱ्या कंपनीला मोठे टार्गेट दिल्याने घाई गडबडीत या ट्रेन बनविल्या गेल्याचे समोर येत आहे. वंदे भारतचा पहिल्या पावसाचा व्हिडीओ समोर येत आहे. हा पहिलाच प्रकार नाहीय, तर एप्रिलमध्ये देखील वंदे भारतचा एक्झिक्युटीव्ह कोचमध्ये पावसाच्या पाण्याची गळती झाली होती.
एप्रिलमध्ये थिरुवनंतपुरम-कासरगोड या नव्यानेच चालू झालेल्या वंदे भारतमध्ये एक्झिक्युटीव्ह कोचला गळती लागली होती. एसी व्हेंटमधून ही गळती झाली होती. आताच्या नव्या व्हिडीओ मध्ये देखील एसी व्हेंटच्या खाली बोगीमध्ये आतील अॅटोमॅटीक दरवाजावर टिप टिप पाणी पडत होते. हे पाणी एवढे होते की रेल्वे कर्मचाऱ्याची धांदल उडाली होती.
रेल्वे कर्मचाऱ्याने घराच्या ओसरीला जसे पाणी गळते तसे थांबविण्यासाठी खाद्यपदार्थांचे ट्रे ठेवून ते पाणी साठविण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, तरी देखील त्याला ते पाणी बोगीभर होण्यापासून थांबविता येत नव्हते. वंदे भारत एक्सप्रेसचे गेल्या काही काळात अनेकदा अपघात झालेले आहेत. जणावरे आदळल्याने अनेकदा पुढील बंपरच तुटून वेगळा झालेला आहे. यामुळे देखील वंदे भारत अनेकदा लोकांच्या निशाण्यावर आलेली आहे.
ही घटना कधीची आहे, कोणत्या राज्यातील ट्रेनमधील आहे याचा खुलासा झालेला नाही. परंतू केरळ काँग्रेसने या गळतीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.