ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 1 - गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सलग शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. दहशतवाद्यांना सीमारेषा ओलांडून घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तान फायरिंग करत आहेत. मात्र अनेकदा पुरावे देऊनही आपण असं काही केलंच नसल्याचा दावा करणा-या पाकिस्तानची पोलखोल करणारा अजून एक पुरावा हाती लागला आहे. कठुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमरेषा ओलांडणा-या दहशतवाद्यांचं सीसीटीव्ही फुटेज भारतीय लष्कराच्या हाती लागलं आहे. या सीसीटीव्हीमध्ये दहशतवादी स्पष्टपणे दिसत आहेत.
घुसखोरीचा प्रयत्न फसल्यानंतर दहशतवाद्यांना पुन्हा माघारी फिरता यावं यासाठी पाकिस्तानकडून फायरिंग केली जात असल्याचं बीएसएफचे डीआयडी धर्मेंद्र पारिख यांनी सांगितलं आहे.
#WATCH: CCTV visuals of Pakistani terrorists infiltrating across the International border in J&K's Kathua district (Thermal imagery) pic.twitter.com/3XNRTzNdTS— ANI (@ANI_news) November 1, 2016
भारतीय लष्कराने २९ सप्टेंबरला केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधी उल्लंघनास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 60 वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधी उल्लंघन केलं आहे.
Infiltration attempts which are being foiled is directly facilitated by Pak so that terrorists can be pulled back: Dharmendra Parikh,BSF DIG pic.twitter.com/TFR3aBGOdN— ANI (@ANI_news) November 1, 2016
पाकिस्तानने केलेल्या फायरिंमध्ये सात लोकांनी आपला जीव गमावला आहे, तर आठ लोक जखमी झाले आहेत. 19 ऑक्टोबरनंतर पाकिस्तानकडून वारंवार सुरु असणा-या फायरिंगमध्ये बीएसएफचे तीन जवान शहीद झाले आहेत. जम्मू सेक्टरमध्ये सर्वात जास्त शस्त्रसंधी उल्लंघन केलं जात आहे. पाकिस्तानी रेंजर्स रात्रीच्या वेळी फायरिंग करत आहेत.
#UPDATE: One more civilian dies in ceasefire violation by Pakistan in Ramgarh sector of Samba (J&K), Death toll now rises to 7.— ANI (@ANI_news) November 1, 2016