तामिळनाडूचेमुख्यमंत्री एम.के. स्टालिन हे १ मार्च २०२३ रोजी ७० वर्षांचे झाले आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत अनेकांनी स्टालिन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर, डीएमके पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठया उत्साहात आणि थाटामाटात त्यांचा जन्मदिवस साजरा केला. त्याचपैकी एका व्यक्तीने स्टालिन यांना चक्क उंटच भेट दिला. या गिफ्टची चांगलीच चर्चा रंगली असून सोशल मीडियावरही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
तिरुवन्नमलाईमधील एक डीएमके कार्यकर्ता जाकीर शाह यांनी आपल्यासमवेत २ वर्षांचा एक उंच आणला होता. विशेष म्हणजे डीएमके पक्षाच्या झंड्यात हा उंट गुंडाळलेला होता. कार्यकर्त्याचं हे गिफ्ट पाहण्याचीही अनेकांना उत्सुकता दिसून आली. तर, सोशल मीडियातही या उंटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री स्टालिन यांनीही उंटासमवेत फोटो काढून ही भेट स्वीकार केली.
दरम्यान, यापूर्वी स्टॅलिन यांना गाय आणि बकरी बेट म्हणून दिली होती. आता, उंट भेट दिल्याने साऊथवाल्यांचा नादच खुळा अशीच चर्चा होतेय. दरम्यान, स्टॅलिनं यांना काँग्रेस नेते राहुल गांधी, अभिनेता आणि नेते कमल हसन, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गजांनीही वाढदिनी शुभेच्छा दिल्या आहेत.
वाढदिवस जल्लोषात, विरोधकांची एकजूट
द्रविड़ मुन्नेत्र कषगम (द्रमुक)चे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांच्या जन्मदिनी विरोधी पक्षांची एकजूट पाहायला मिळाली. चेन्नईतील बड्या नेत्यांनी एकत्र येत त्यांचा वाढदिवस साजरा केला. युपीतून अखिलेख यादव, दिल्लीतून मल्लीकार्जुन खर्गे आणि काश्मीरमधून फारुक अब्दुल्ला हे तामिळनाडूत पोहोचले होते. तर, बिहारमधून तेजस्वी यादवही येथे आले होते. या सर्व नेत्यांनी भाजपला रोखण्यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. तसेच, आधी एकत्र येऊयात, पुन्हा पीएम पदाचा उमेदवार ठरवुयात, असाही सूर येथे पाहायला मिळाला.