नवी दिल्ली – चंद्राच्या कक्षेत प्रवेश घेताच चंद्रयान ३ ने चांदोमामाचा छान व्हिडिओ पाठवला आहे. भारतीय अंतराळ संस्था(ISRO) नं १५ ऑगस्ट रोजी चंद्रयानने घेतलेला व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत चंद्रावर असलेले खड्डे दिसत आहेत. विक्रम लँडरच्या कॅमेऱ्याने हा व्हिडिओ पाठवला आहे. चंद्रयान ३ च्या लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा(LPDC)ने १५ ऑगस्ट रोजी चंद्रावरील हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केल्याचे म्हटलं आहे.
त्याचसोबत १७ ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्यूलपासून लँडर मॉड्यूल वेगळे केल्यानंतरही लँडर इमेजर म्हणून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. भारतासाठी आनंदाची बातमी म्हणजे लँडर मॉड्यूलची स्थिती सर्वसामान्य आहे. डिबूस्टिंग ऑपेरेशनमुळे लँडर मॉड्यूलने त्याचा वेग कमी केला आहे. इस्त्रोने चंद्रावरील २ व्हिडिओ ट्विट केले आहेत.
पाहा व्हिडिओ -
चंद्रयान ३ हे चंद्रावरील दक्षिण धुव्रावर पोचणार आहे. तिथे उतरून तेथील पृष्टभाग, पाणी, खनिजे आदींचा अभ्यास करणार आहे. तिथे केवळ १४ दिवसच अभ्यास करेल. कारण नंतर पूर्णत: अंधार होणार आहे. चंद्रावरील दक्षिण धुव्रावर यान उतरविणारा भारत पहिला देश ठरणार आहे.