ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - केंद्र सरकार 'सर्जिकल स्ट्राईक'चा व्हिडिओ जाहीर करणार नसल्याची माहिती समोर येत आहे. हा व्हिडिओ केवळ संसदेच्या सुरक्षा समितीलाच दाखवणार जाणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी सुरक्षा समितीतील सदस्यांना हा व्हिडिओ दाखवला जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा व्हिडिओ जाहीर न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, या समितीतील 31 सदस्यांपैकी महाराष्ट्रातील तीन सदस्य आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे खासदार राजीव सातव आणि राष्ट्रावादीचे प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्रातील या तीन नेत्यांचा या सुरक्षा समितीत समावेश आहे.
आणखी बातम्या
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्याचा पुरावा सादर करावा, अशी मागणी अनेकांकडून होत आहे. यानंतर या कारवाईचा व्हिडिओ भारतीय लष्कराने केंद्र सरकारकडे सुपुर्द केला. मात्र, आता व्हिडिओ जाहीर न करता केवळ सुरक्षा समितीलाच दाखवण्यात येणार असल्याची बाब समोर येत आहे.