सोशल मीडियावर आपण रोज नवनवीन व्हिडीओ पाहतो. यातील काही व्हिडीओ आश्चर्यकारक तर काही चिंताजनक आहेत. असाच एका वृद्ध महिलेचा हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ओडिशातील नबरंगपूर जिल्ह्यातील आहे. ज्यामध्ये एक 70 वर्षीय महिला पेन्शन घेण्यासाठी तुटलेली खुर्ची घेऊन रस्त्यावर अनवाणी चालताना दिसत आहे. जिल्ह्यातील झारीगन ब्लॉकमधील बनुआगुड़ा गावातील सूर्या हरिजन असं या वृद्ध महिलेचं नाव आहे.
व्हिडिओमध्ये वृद्ध महिला अत्यंत गरीब दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एसबीआय बँकेचे मॅनेजर म्हणाले, त्यांची बोटे तुटली आहेत, त्यामुळे त्यांना पैसे काढण्यास त्रास होत आहे. आम्ही लवकरच ही समस्या सोडवू. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने गेल्या चार महिन्यांपासून तिची पेन्शन स्वीकारलेली नाही. महिलेच्या पायाला ऑर्थोपेडिक दुखापत झाली आहे, त्यामुळे तिला चालायला खूप त्रास होत आहे. तरी ती पेन्शनसाठी बँकेत हजर राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशामध्ये उष्णतेचा प्रकोप सुरूच आहे. राज्याची राजधानी भुवनेश्वरमध्ये पारा 43.2 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. अशा परिस्थितीत उन्हात बाहेर पडणे कठीण होत आहे. दरम्यान, वृद्ध महिलेला पायी जाणे अत्यंत धक्कादायक आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक कमेंट करत आहेत. आपला संताप व्यक्त करत आहेत.
मॅनेजरच्या स्वत:च्या आईला अशा यातना सहन कराव्या लागल्या तर... अशी कमेंट एका युजरने केली आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, हे लोक लंच ब्रेकनंतर समस्या सोडवतील. आजच्या काळात मदत करण्यापेक्षा व्हिडीओ बनवणे महत्त्वाचे आहे. व्हिडीओ कोणी बनवला त्याने बँकेत जाण्यासही मदत केली असती. वाहनाची व्यवस्था करून दिली असती असंही एकाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"