दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून बाबा रामदेव यांनी यज्ञ केला आहे. तसेच सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी बाबा रामदेव यांनी हरिद्वार येथे हवन केले. वयाच्या ३४ व्या वर्षी सुशांतने आत्महत्या केली. या घटनेला आता दोन महिने उलटले आहे. बाबा रामदेव म्हणाले की, आता निदान त्यांच्या दिवंगत सुशांतच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळेल. रामदेव बाबांनी या हवनाचा व्हिडीओ देखील ट्विटरवर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये रामदेव बाबा यांनी सुशांत आणि त्याच्या कुटूंबाला न्याय मिळवून देण्याविषयी बोलत आहेत. बाबा रामदेव म्हणाले, 'मी श्री सुशांत यांच्या कुटूंबाशी बोललो, जेव्हा मी त्यांची वेदना ऐकली तेव्हा माझा आत्माही थरथर कापू लागला, आम्ही सर्वजण पतंजलीमध्ये त्या दिवंगत आत्म्यासाठी प्रार्थना करीत आहोत, आम्हाला सुशांत सिंग राजपूत आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवा.'बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्या मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी ५६ जणांचा जबाब नोंदवला आहे.बिहार सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यासाठी केलेली शिफारस केंद्राने मान्य केली. दरम्यान, रिया चक्रवर्ती हिने याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालय 13 ऑगस्ट रोजी याबाबत निर्णय देईल. याशिवाय सुशांतच्या खात्यातून काढण्यात आलेल्या 15 कोटींबाबत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांकडून सतत विचारपूस करत आहे. आतापर्यंत ईडीने रियाचे भाऊ-वडील आणि सुशांतचे माजी व्यवस्थापकची देखील चौकशी केली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी
Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी
सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत
डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको
सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...
Video : देव तारी त्याला कोण मारी! कारने फरफटत नेऊनही महिला बचावली, रुग्णालयात उपचार सुरु
स्वातंत्र्यदिनी दिल्या जाणाऱ्या पोलीस पदके केंद्राकडून जाहीर