शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

VIDEO - तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी सिद्ध केले बहुमत

By admin | Published: February 18, 2017 11:50 AM

तामिळनाडूचे मुख्यमंत्री इदापादी के पालानीस्वामी यांनी अखेर 122 आमदारांच्या पाठिंब्यासह तामिळनाडू विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला.

ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. 18 - तामिळनाडूचे मुख्यमंत्री इदापादी के पालानीस्वामी यांनी अखेर 122 आमदारांच्या पाठिंब्यासह तामिळनाडू विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. द्रमुकच्या आमदारांनी तोडफोड आणि गदारोळ केल्यामुळे त्यांना सभागृहाबाहेर काढल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला.विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी अण्णाद्रमुकचे आणि पनीरसेल्वम गटाचे आमदार उपस्थित होते. द्रमुकचे 88 आणि आययूएमएलच्या एक असे मिळून 89 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले होते.  
 
तामिळनाडू विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्याच्या दरम्यान शनिवारी एकच गदारोळ झाला.  गुप्त मतदान घेण्याची द्रमुक आमदारांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळल्याने संतापलेल्या द्रमुक आमदारांनी खुर्च्यांची मोडतोड केली. विधानसभा अध्यक्षांसमोरच्या टेबलही तोडले. आमदारांच्या या हिंसक वर्तनामुळे तामिळनाडू विधानसभा दुपारी 1 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. 
 
द्रमुक, काँग्रेसच्या आमदारांनी पनीरसेल्वम गटाला पाठिंबा दिला असून, त्यांनी केलेली गुप्तमतदानाची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिलेली असताना मुख्यमंत्री इदापादी के पलानीस्वामी यांनी आजच बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
235 सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेमध्ये शशिकला गटाच्या पलानीस्वामी यांनी 124 आमदारांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. राज्यपालांनी 15 दिवसांची मुदत दिलेली असताना बहुमत सिद्ध करण्याची इतकी घाई का ? असा सवाल द्रमुक नेते एम.के.स्टालिन यांनी विचारला.