Video: बहिणीच्या लग्नात करत होती डान्स, हार्ट अटॅक आला अन् तरुणीचा गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:15 IST2025-02-10T15:13:32+5:302025-02-10T15:15:00+5:30
Vidisha news: मध्य प्रदेशात एका तरुणीचा बहिणीच्या लग्नात डान्स करताना मृत्यू झाला. डान्स करत असतानाच तरुणी अचानक खाली कोसळली.

Video: बहिणीच्या लग्नात करत होती डान्स, हार्ट अटॅक आला अन् तरुणीचा गेला जीव
Vidisha news today: एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एक तरुणी डान्स करत आहे. डान्स करत असतानाच अचानक तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. त्यानंतर तिचा मृत्यू होतो. अक्षरशः मृत्यूचं कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पण, हा व्हिडीओ बघून सगळेच हळहळ व्यक्त करत आहेत. कारण तंदुरुस्त दिसणाऱ्या या तरुणीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मध्य प्रदेशात ८ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे. विदिशा शहरात ही घटना घडली असून, डान्स करताना मृत्यू झालेली तरुणी नवरीची बहीण होती.
याबद्दल मिळालेली माहिती अशी की, डान्स करताना हार्ट अटॅक येऊन मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव परिणीता जैन आहे. ती इंदौरला राहते. बहिणीच्या लग्नासाठी ती विदिशाला आली होती.
बहिणीच्या संगीत सोहळ्यातील हा व्हिडीओ आहे. परिणीता जैन डान्स करत होती. त्याचवेळी तिला हार्ट अटॅक आला आणि ती खाली कोसळली.
ये तो बहुत दुखद हुआ ! विदिशा में डांस करते समय युवती की मौत, नाचते-नाचते स्टेज पर ही गिर पड़ी, इंदौर से अपनी बहन की शादी में शामिल होने आई थी @VistaarNewspic.twitter.com/ziQysP9ua1
— Brajesh Rajput (@drbrajeshrajput) February 9, 2025
उपस्थित असलेल्या लोकांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तपासणी करून डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. परिणीताला हार्ट अटॅक आला होता, असे डॉक्टरांनी सांगितले.
डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या निमित्ताने हार्ट अटॅक आणि आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.