Video ...मग धान्य सोड, दिवे लाव! मोदींना चांगले म्हटल्याने काँग्रेस आमदार वृद्धेवर संतापला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 03:09 PM2020-04-20T15:09:07+5:302020-04-20T15:22:58+5:30
रेशन वितरणावेळी आमदार राजेंद्र बिधुडी यांनी महिलेला धान्य देताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत की पंतप्रधान मोदी चांगले आहेत, असा प्रश्न विचारला.
जयपूर : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या गरीबांचे हाल होत आहेत. अशा अडलेल्यांना मदत करण्यात येत आहे. विविध पक्षांनी, संघटनांनी त्यांच्या पद्धतीने लोकांना धान्य वाटण्यास सुरुवात केली आहे. अशाच एका धान्य वाटप कार्यक्रमामध्ये महिलेचे मोदी चांगले आहेत, असे उत्तर ऐकून बेगूच्या काँग्रेस आमदाराची तळपायाची आग मस्तकात गेल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामुळे राजस्थानमधील राजकारण तापू लागले आहे.
रेशन वितरणावेळी आमदार राजेंद्र बिधुडी यांनी महिलेला धान्य देताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत की पंतप्रधान मोदी चांगले आहेत, असा प्रश्न विचारला. यावर महिलेच्या तोंडून मोदी असे उत्तर आल्याने आमदार महाशयांचा पारा चढला. त्यांनी महिलेला रेशन इथेच ठेव आणि घरी जाऊन दिवे लावण्यास सांगितले. या घटनेच्या व्हिडीओमुळे राजस्थानातील राजकीय वातावरण तापले आहे. हा व्हिडीओ भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्यासह नेत्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
सोनिया जी
— Sambit Patra (@sambitswaraj) April 19, 2020
ये question paper आप ने सेट किया है कांग्रेस शासित राज्यों के लिए?
राशन देते समय पूछा जाता है की बोलो मोदी अच्छा है या अशोक गहलोत?
और अगर बूढ़ी माँ मोदी का नाम लेती है तो उससे राशन वापस लिया जाता है
आप के विधायकों को शर्म आनी चाहिए इस अमानवीय व्यवहार के लिए
विडीओ देखें pic.twitter.com/WGHPehpc8u
संबित पात्रा यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आहे. ही प्रश्नपत्रिका तुम्हीच काढली का? रेशन देताना विचारले जात आहे मोदी चांगले की गेहलोत? जर वृद्धेने मोदींचे नाव घेतले तर तिच्याकडून रेशन काढून घेतले जात आहे. तुमच्या आमदारांना लाज वाटायला हवी असे वागण्यापूर्वी, अशी टीका केली आहे.
CoronaVirus खूशखबर! कोरोनाच्या 'मंदी'तही बंपर भरती; २ लाख नोकऱ्यांची संधी
CoronaVirus क्रूर थट्टा! तुमचा मृत्यू झालाय, पैसे कसे देऊ? वृद्धेला बँक कर्मचाऱ्याचे उत्तर
चीनची 'कोरोना'आडून मोठी चाल; मोदी सरकारने उधळल्याने HDFC बँक वाचली