Viral Video: भारतात दररोज लाको लोक ट्रेनने प्रवास करतात. अनेकदा ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर चोरीच्या घटना घडतात. यात मोबाईल चोरीच्या घटना सर्वाधिक घडतात. 'प्रवाशांनी त्यांच्या सामानाचे संरक्षण स्वतः करावे', अशी घोषणा नेहमीच रेल्वे स्टेशनवर केली जाते. असे असतानाही निष्काळजीपणामुळे सामानाची चोरी होते. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक चोर एतिशय चपळाईने झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून मोबाईल चोरताना दिसत आहे.
अनेकदा ट्रेन उशिराने येत असल्याने लोक प्लॅटफॉर्म जागा मिळेल तिथे झोपतात. अशा परिस्थितीत चोरीच्या घटना अधिक घडतात. व्हायरल व्हिडिओमध्ये एक चोर प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या व्यक्तीच्या खिशातून फोन चोरताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर काही लोक जमिनीवर झोपलेले दिसत आहेत. या दरम्यान, एक व्यक्ती अतिशय हुशारीने झोपलेल्या व्यक्तीच्या खिशात हात टाकून फोन घेऊन पळ काढतो.
यावेळी तेथून लोकही जात असतात, मात्र या चोरट्यावर कोणालाच संशय येत नाही. आरपीएफ इंडियाने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओ स्टेशनवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. व्हिडिओ समोर आल्यानंतर RPF हावडाने चोराला पकडले. व्हिडिओ शेअर करण्यासोबतच आरपीएफने प्रवाशांना त्यांच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याचा आणि गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.