बंगळुरू - कम्युनिष्ट पक्षाचे नेते आणि दिल्ली विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांचे एक भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कर्नाटकमधील मंगळुरू येथील एका कार्यक्रमात तरुणीच्या आक्रमक प्रश्नांना कन्हैय्या कुमारने शांतपणे उत्तरे दिली. विशेष म्हणजे, कन्हैय्या कुमारच्या उत्तरावर उपस्थित विद्यार्थ्यांनी कन्हैय्याला दाद दिली. या तरुणीने कन्हैय्याल प्रश्न विचारताना जय श्रीराम असे म्हणून सुरुवात केली होती. त्यावेळी, उपस्थितांनी तिला दाद दिली.
कर्नाटकमधील कम्युनिष्ट पक्षाचे नेते बीव्ही ककिलाया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंगळुरू येथए युवकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला कन्हैय्या कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी, एका तरुणीने कन्हैय्या कुमारला जय श्रीराम असे म्हणून अनेक प्रश्न विचारले. तसेच, जय हिंद म्हणण्याचीही अपेक्षा व्यक्त केली. तर वन नेशन धोरणाला तुमचा का विरोध आहे, असेही तिने विचारले. या युवतीच्या प्रश्नाला उत्तर देताना, कन्हैय्या कुमारने सुरुवातीला तुमच्याकडे जय श्रीराम तर आमच्याकडे सिताराम असे म्हणत उत्तर दिले. त्यांनंतर, वन नेशन, वन पार्टीबद्दलच्या प्रश्नावरही कन्हैयांनी दिलेल्या उत्तराला सभागृहातील विद्यार्थी दाद देताना दिसले.
मुळात माझी उत्पत्तीच दोन व्यक्तींपासून झालेली आहे. माझे आई आणि वडिल जेव्हा एकत्र आले, तेव्हाच माझा जन्म झाला. भारताचे एक संविधान 300 पेक्षा जास्त आर्टीकल आहेत. आपल्या देशाच्या संसदेतही दोन सभागृहत आहेत. या सभागृहात देशभरातून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्याही 545 एवढी आहे. आपली लोकशाही ही युनिटी ऑफ डायवर्सिटी या तत्वानुसार चालते, असे म्हणत कन्हैय्या कुमारने युवतीच्या प्रश्नावर उत्तर दिले.