Video : 25 वर्षे आमदार असताना काय केले? तरुणाच्या माजी मुख्यमंत्र्यांनी कानशिलात लगावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 12:50 PM2019-05-06T12:50:50+5:302019-05-06T12:52:48+5:30
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्ठल या पंजाबच्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री होत्या. 1992 ते 2017 पर्यंत त्या आमदार होत्या. 2017 मध्ये त्या पराभूत झाल्या होत्या.
संगरूर (पंजाब) : लोकसभा, विधानसभेमध्ये निवडून गेलेल्या उमेदवाराला त्याने काय काम केले हे विचारणे मतदाराचे आद्य कर्तव्य आहे. मात्र, पंजाबमध्ये असे विचारणाऱ्या तरुणालाच माजी मुख्यमंत्री राहिलेल्या महिला नेत्याने कानाखाली लगावल्याचा प्रकार नुकताच घडला. यावरच न थांबता त्या तरुणाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फरपटत दुसऱ्या बाजुला नेले.
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्ठल या पंजाबच्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री होत्या. 1992 ते 2017 पर्यंत त्या आमदार होत्या. 2017 मध्ये त्या पराभूत झाल्या होत्या. राजिंदर कौर या काँग्रेसचे उमेदवार केवल सिंह ढिल्लों यांच्या प्रचारासाठी रविवारी बुशैहरा गावात आल्या होत्या. यावेळी एका युवकाने त्यांना प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गप्प बसविले. मात्र, तरुणाने पुन्हा प्रश्न विचारताच राजिंदर कौर यांचा पारा चढला. त्यांन थेट त्या युवकाच्या कानशिलातच भडकाविली आणि प्रचारसभेतून तडक बाहेर पडल्या.
राजिंदर कौर मंचावर आल्या होत्या यावेळी त्या युवकाने त्यांना तुम्ही या भागाच्या विकासासाठी काय केले, असा प्रश्न विचारला. य़ावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना नंतर विचार असे सांगत शांत बसविले. प्रचारसभा झाल्यावर राजिंदर सिंह जायला लागल्या तेव्हा या तरुणाने, 'तुम्ही गेली 25 वर्षे या भागातील आमदार आहात, या काळात काय विकास केला?', असा प्रश्न विचारला. यावर राजिंदर कौर नाराज झाल्या. या युवकाचे नाव कुलदीप असे आहे.
A senior congress leader & former Chief Minister of Punjab Rajinder Kaur Bhattal slapped a young man during a election rally in #SANGROOR district. When this young man asked a question to Bhattal , She got irritated and slapped young man . pic.twitter.com/5VNuomZvqs
— Ravinder Singh Robin ਰਵਿੰਦਰ ਸਿੰਘ راویندرسنگھ روبن (@rsrobin1) May 5, 2019
याचवेळी कुलदीपने त्यांना रोजगाराविषयीही विचारले, यावर त्या मंचावरून खाली येत कुलदीरच्या कानाखाली मारली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुलदीपला बाजुला नेले. वातावरण तापल्यानंतर तेथील लोकांना काँग्रेस उमेदवार, रोजिंदर कौर यांच्याविरोधात घोषणाबाजी देण्य़ास सुरुवात केली.
यावर राजिंदर कौर यांनी आपवर आरोप केले आहेत. प्रचारामध्ये बाधा निर्माण करण्यासाठी आप तरुणांना वापरत आहे. त्यांच्या मनामध्ये काहीही भरविले जात आहे.