ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या कारगिल युद्धातील शहीद जवानाची मुलगी गुरमेहर कौरवर एकीकडे टीका होत असून दुसरीकडे पाठिंबाही मिळत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध मोहीम छेडल्याने गुरमेहर कौर चर्चेत आली. गुरमेहर कौरने सोशल मीडियावर कॅंपेन सुरू करत एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर तिच्या ट्विटला विरेंद्र सेहवागने दिलेल्या उत्तरानंतर मात्र हा मुद्दा चर्चेला आला.
गुरमेहर कौर आणि वादावर संबंधित बातम्या -
गुरमेहरच्या हातात असलेल्या एका पोस्टरवर ''माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारलं'' असं लिहीलेलं होतं. गुरमेहरचे वडिल कारगिल युद्धात शहीद झाले होते. यानंतर गुरमोहर चर्चेत आली होती. यानंतर सेहवागने गुरमोहरच्या या ट्विटला उत्तर दिलं होतं. 'मी दोन वेळेस त्रिशतक झळकावलं नाही तर माझ्या बॅटने त्रिशतक झळकावलं', असं खिल्ली उडवणारं ट्विट केलं.
ज्या व्हिडीओमुळे गुरमेहर चर्चेत आली आहे तो व्हिडीओ तिने मे महिन्यात अपलोड केला होता. यामध्ये तिने आपल्या वडिलांच्या आठवणी आणि युद्दाबद्दल आपलं मत मांडलो होतं.
हाच तो व्हिडीओ -