वलसाड (गुजरात) - सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांनी आज राजस्थान आणि गुजरातचा दौरा केला. या दौऱ्यावेळी दोन्ही राज्यांत त्यांचे जोरदार स्वागत झाले. मात्र या स्वागतादरम्यान राहुल गांधी यांना एका अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले. त्याचे झाले असे की, राहुल गांधी हे गुजरातमधील वलसाडच्या दौऱ्यावर असताना काही महिला कार्यकर्त्यांनी स्टेजवर येत त्यांचे स्वागत केले. यादरम्यान एका महिला कार्यकर्तीने चक्क राहुल गांधी यांना किस केले. या अनपेक्षित प्रकारामुळे राहुल गांधी यांचाही क्षणभर गोंधळ उडाला. तसेच भर स्टेजवर घडलेला हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्याची चर्चाही झाली.
VIDEO : ...अन् तिनं भर स्टेजवर राहुल गांधींना 'किस' केलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 15:46 IST
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांनी आज राजस्थान आणि गुजरातचा दौरा केला.
VIDEO : ...अन् तिनं भर स्टेजवर राहुल गांधींना 'किस' केलं!
ठळक मुद्देआज गुजरात दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांना एका अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले. राहुल गांधी हे गुजरातमधील वलसाडच्या दौऱ्यावर असताना एका महिला कार्यकर्तीने चक्क राहुल गांधी यांना किस केले.