Video : आत्महत्या करण्याचा तरुणीने केला प्रयत्न, अग्निशमन दलाने केले रेक्स्यु
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 20:57 IST2020-07-31T20:56:25+5:302020-07-31T20:57:21+5:30
मुलीला समजवण्यासाठी काही लोक जवळच्या इमारतीच्या टेरेसवर धावले.

Video : आत्महत्या करण्याचा तरुणीने केला प्रयत्न, अग्निशमन दलाने केले रेक्स्यु
उज्जैन - गुरुवारी शहरातील गोवर्धन धाम बसरा इमारतीत एकाच गोंधळ उडाला होता. एका मुलीने आपले जीवन संपवण्याच्या उद्देशाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या सज्ज्यावर बसली होती. लोकांना या घटनेची माहिती मिळताच खळबळ उडाली. मुलीला समजवण्यासाठी काही लोक जवळच्या इमारतीच्या टेरेसवर धावले.
लोकांनी त्या युवतीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती काही समजून घ्यायला आणि त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हती. पोलिस आणि अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली. ज्या वेळी पोलिस व पालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले. आगशीमन दलाच्या बऱ्याच प्रयत्नानंतर मुलीला दुसर्या मजल्याच्या खिडकीच्या सज्ज्यावरून सुखरुप रेस्क्यू करण्यात आले. तरुणी मानसिक दृष्ट्या कमजोर असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने तिला वाचविण्यात आले.
मुलीच्या कुटुंबातील सदस्य घाबरले. दुसऱ्या मजल्यावरील खिडकीवर चढून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गोवर्धनधाममध्ये सुमारे 2 तास लोकांमध्ये खळबळ माजली होती.
#WATCHमध्य प्रदेश, उज्जैन: आत्महत्या की कोशिश कर रही एक लड़की को फायर ब्रिगेड ने सफलतापूर्वक बचाया।
— ANI_HindiNews (@AHindinews) July 30, 2020
SI प्रवीण पाठक ने बताया, "लड़की (सलोनी) खिड़की से निकलकर कूदने की कोशिश कर रही थी। फायर ब्रिगेड की मदद से उसे उतारा गया। वो मानसिक रोगी है।" pic.twitter.com/BJmB34eKKS
अन्य महत्वाच्या बातम्या...
गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी
मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल
तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्...