नवी दिल्ली : भारतात कोरोनाचे 275 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून आजच्या एकाच दिवसात विविध राज्यांमध्ये ३५ नवीन रुग्ण सापडले आहेत. यामुळे भारतातील कोरोनाचे संक्रमण तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कर्फ्यू लागू केला असून पुढील आठवडा आपल्यासाठी महत्वाचा असल्याचे म्हटले आहे.
सर्वच राज्ये त्यांच्या परीने प्रयत्न करत असून महाराष्ट्र, दिल्लीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सारे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही सोशल मीडियाद्वारे देशवासियांना आवाहन करत आहेत. त्यांनी तरुणांना कोरोनाला रोखण्यासाठी करता येणाऱ्या उपाययोजना शेअर करण्यास सांगितले आहे.
यानतर पुढचे पाऊल म्हणून त्यांनी देशवासियांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करताना कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा देण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी यांनी रविवारी २२ मार्चला 'जनता कर्फ्यू' लागू करण्याचा निर्णय घेतला. आज मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्याव्दारे त्यांनी कोरोनाचा प्रसार करा होऊ शकतो हे सांगितले आहे.
तुम्ही घेतलेली एका मिनिटाची काळजी कोरोनामुळे होणारे नुकसान आणि अनेकांचा जीव वाचवू शकते असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आधीच व्हायरल होत आहे. असेच व्हिडीओ तुमच्याकडे असतील तर ते कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी #IndiaFightsCorona या हॅशटॅगवर पोस्ट करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
‘बाळा, लवकरच घरी येईन पण...’; कोल्हापूरचा तरुण उद्योजक ऑफ्रिकेमध्ये अडकला
भारतीयाचा डंका; अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला धोबीपछाड