देशातील 5 राज्यात कोण जिंकणार? सर्व EXIT POLL चे आकडे एकाच ठिकाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 08:38 PM2018-12-07T20:38:56+5:302018-12-07T20:41:40+5:30
देशातील पाच राज्यांत घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल आले आहेत. त्यानुसार काही राज्यात सत्ताबदल तर काही राज्यात जैसे थे परिस्थिती दिसत आहे.
मुंबई - पाच राज्यांमधील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि इजन्सींचे एक्झिट पोल प्रसिद्ध झाले आहेत. एक्झिट पोलमधील अंदाजामधून या निवडणुकीत केंद्र आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपाला जबदस्त धक्का बसण्याचे संकेत मिळत आहेत. तर राजस्थानसह, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही काँग्रेसच्या पुनरागमनाची चिन्हे दिसत आहेत.
* विविध वृत्तवाहिन्या आणि इजन्सींचे राज्यानुसार एक्झिट पोल
राज्य - मध्य प्रदेश, एकूण जागा - 230
एबीपी न्यूज-लोकनीती : भाजपा 94, काँग्रेस 126, इतर 10
टाइम्स नाऊ - सीएनएक्स : भाजपा 126, काँग्रेस 89, इतर 15
इंडिया टुडे - अॅक्सिस माय इंडिया : भाजपा 102-120, काँग्रेस 104-122, इतर 4 ते 11
रिपब्लिक- सीवोटर - भाजपा 90-106, काँग्रेस 110-126, इतर 6-22
न्यूज नेशन : भाजपा - 108-112, काँग्रेस- 105-109, इतर- 11-15
----------------------------------------------------------------------------
राज्य - राजस्थान, एकूण जागा (200)
एबीपी न्यूज-लोकनीती : भाजपा 83, काँग्रेस 101, इतर 15
टाइम्स नाऊ - सीएनएक्स : काँग्रेस 105, भाजपा 85, इतर 9
इंडिया टुडे - अॅक्सिस माय इंडिया : काँग्रेस 119-141, भाजपा 55 ते 72, इतर 4 ते 11
अॅक्सिक माय इंडिया : भाजपा 55-72, काँग्रेस 119-141, इतर 4-11
जन की बात : भाजपा 83-103, काँग्रेस 81-101, इतर 15
-------------------------------------------------------------
राज्य - तेलंगणा, ( एकूण जागा 119)
न्यूज नेशन एक्झिट पोल : TRS 55 जागा, काँग्रेस 53 जागा, भाजपा 3 जागा, इतर 8 जागा.
टाइम्स नाऊ - सीएनएक्स : TRS 66 जागा, काँग्रेस+ 37 जागा, भाजपा 7 जागा, इतर 9 जागा.
इंडिया टुडे - अॅक्सिस माय इंडिया : टीआरएस 85, काँग्रेस आघाडी 27, भाजपा 2, इतर 5
रिपब्लिक- सीवोटर - टीआरएस 50-65, काँग्रेस आघाडी 38-52, भाजपा 4-7, इतर 8-14
सी-वोटर का एक्झिट पोल : TRS 54 जागा, काँग्रेस 53 जागा, भाजपा 5 जागा, इतर 7 जागा.
-----------------------------------------------------------------
राज्य - छत्तीसगड, (एकूण जागा 90)
एबीपी न्यूज-लोकनीती : भाजपा- 52, काँग्रेस-35, इतर- 03
टुडेज-चाणक्य : भाजपा-36, काँग्रेस-50, इतर - 4
टाइम्स नाऊ - सीएनएक्स : भाजपा- 46 जागा, काँग्रेस- 35 जागा, बीएसपी+जेसीसी- 7 जागा, इतर - 02.
इंडिया टुडे : भाजापा- 42-50, काँग्रेस- 32-38, बसपा+जेसीसी- 6-8 जागा, इतर- 1-3
अॅक्सिस माय इंडिया : भाजपा- 26, काँग्रेस- 60, इतर - 4
रिपब्लिक- सीवोटर : भाजपा -39, काँग्रेस- 46, इतर -5
न्यूज नेशन : भाजापा- 40 जागा, काँग्रेस- 42 जागा, इतर - 8 जागा.
------------------------------------------------------
राज्य - मिझोरम ( एकूण जागा 40 )
रिपब्लिक-सी वोटर : एमएनएफ- 16-20, काँग्रेस- 14-18, अन्य- 0-3