शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

अवघ्या पाच मिनिटांत पाकिस्तानचा बुरखा फाडणारी कोण आहे 'ती'?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 11:35 AM

काश्मीरवरुन थयथयाट करणाऱ्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात सुनावले खडे बोल

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणाला भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रधान सचिव विदिशा मैत्रा यांनी अवघ्या पाच मिनिटांत संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला. संयुक्त राष्ट्रात प्रत्येक देशाला स्वत:ची बाजू मांडण्याचा अधिकार असतो. मात्र इम्रान खान यांच्या भाषणाच्या रुपात पहिल्यांदाच एखाद्या देशानं या अधिकाराचा इतका मोठ्या प्रमाणात दुरुपयोग पाहिला असेल, अशा शब्दांमध्ये मैत्रा यांना पाकिस्तानवर शाब्दिक हल्ला चढवला. संयुक्त राष्ट्रात काश्मीर राग आळवणाऱ्या इम्रान खान यांना विदिशा मैत्रा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'भारतावर टीका करताना पाकिस्तानकडून विध्वंस, रक्तरंजित, बंदूक उचलू, शेवटपर्यंत लढू अशा शब्दांचा वापर करण्यात आला. या सर्व शब्दांमधून पाकिस्तानच्या नेतृत्त्वाचा दृष्टीकोन दिसतो. त्यांची मानसिकता मध्ययुगीन आहे. २१ व्या शतकातला दृष्टीकोन त्यांच्या विधानांमध्ये कुठेही दिसत नाही,' अशा शब्दांमध्ये मैत्रा पाकिस्तानवर बरसल्या.काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यावरुन पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रातही थयथयाट केला. 'कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरच्या विकासाला बाधा येत होती. मात्र त्यावर पाकिस्ताननं दिलेल्या प्रतिक्रियेतून त्यांच्या मनातला द्वेष दिसतो. शांतता निर्माण करण्यात पाकिस्तानला काडीमात्र रस नाही. त्यांना केवळ युद्धातच स्वारस्य आहे. त्यांच्या विधानांवरुन हेच स्पष्ट होतं,' असं म्हणत मैत्रा यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले. विदिशा मैत्रा भारतीय परराष्ट्र सेवेच्या २००९ बॅचच्या अधिकारी आहेत. त्या २००८ मध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. या परीक्षेत मैत्रा देशात ३९ व्या आल्या होत्या. २००९ मध्ये त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं. त्यामध्ये त्यांना बेस्ट ट्रेनिंग ऑफिसर म्हणून सुवर्णपदक मिळालं. त्या सध्या संयुक्त राष्ट्रात भारताच्या प्रधान सचिव म्हणून काम करतात. संयुक्त राष्ट्रातील त्या भारताच्या सर्वात नव्या अधिकारी आहेत.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370