शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

विजय दर्डा यांनी घेतली उपराष्ट्रपती धनखड यांची भेट, 2 पुस्तकेही दिली गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 9:19 AM

विविध विषयांवर चर्चा; यवतमाळला येण्याचे दिले निमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सोमवारी संध्याकाळी येथे उपराष्ट्रपती भवनात भेट घेतली.

उपराष्ट्रपतिपदी निवड झाल्याबद्दल विजय दर्डा यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांची चर्चा जवळपास अर्धा तास चालली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. महाराष्ट्राचे प्रथम क्रमांकाचे वृत्तपत्र असलेल्या आणि देशातील आघाडीच्या भाषिक वृत्तपत्रांपैकी एक असलेल्या लोकमत माध्यम समूहाची उपराष्ट्रपतींनी सविस्तरपणे चौकशी केली. विजय दर्डा यांनी याबाबत उपराष्ट्रपतींना माहिती दिली की, हा वृत्तपत्र समूह हिंदी (लोकमत समाचार) आणि इंग्रजी (लोकमत टाइम्स) वृत्तपत्र प्रकाशित करतो. न्यूज १८ समूहाच्या सहकार्याने आणि मराठी भाषेतील टीव्ही न्यूज चॅनेलच्या साथीने लोकमतचे डिजिटल क्षेत्रातील पाऊलही अतिशय यशस्वी झालेले आहे. उपराष्ट्रपती हे राजस्थानचे आहेत आणि दर्डा यांचे पूर्वज हे त्याच राज्यातील आहेत. त्यामुळे उभयतांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आदल्या दिवशी दर्डा यांनी माजी परराष्ट्र मंत्री के. नटवर सिंग यांचीही भेट घेतली आणि त्यांच्याशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी दर्डा यांनी के. नटवर सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांची दोन पुस्तके ‘रिंगसाइड’ आणि ‘पब्लिक इश्यू बिफोर पार्लमेंट’ ही त्यांना भेट दिली.

उपराष्ट्रपतींना दोन पुस्तके दिली भेटnयावेळी दर्डा यांनी उपराष्ट्रपती धनखड यांना नवीन पुस्तक ‘रिंगसाइड : अप, क्लोज अँड पर्सनल ऑन इंडिया अँड बियाँन्ड’ आणि ‘पब्लिक इश्यू बिफोर पार्लमेंट’ ही दोन पुस्तके भेट दिली आणि त्यांच्याशी कायद्याच्या संबंधित मुद्द्यावर चर्चा केली. उपराष्ट्रपती धनखड हे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील होते हे येथे नमूद करणे उचित आहे. nयावेळी विजय दर्डा यांनी त्यांचे वडील आणि लोकमत मीडिया समूहाचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांचा संगमरवरी अर्धपुतळा उपराष्ट्रपतींना भेट दिला. महाराष्ट्रातील त्यांचे मूळ गाव यवतमाळ येथे येण्याचे निमंत्रण यावेळी दर्डा यांनी उपराष्ट्रपतींना दिले.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाdelhiदिल्ली