नवी दिल्ली - देशभरात आज विजय दिवस साजरा करण्यात येत आहे. 1971 साली आजच्याच दिवशी भारताने पाकिस्तानवर युद्धात विजय मिळवला होता. भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या दुस-या युद्धात भारतीय सैन्याच्या पराक्रमासमोर पाकिस्तानने अक्षरक्ष: गुडघे टेकत शरणागती पत्करली होती. पाकिस्तानी लष्कराच्या तत्कालिन कमांडरने शरणागतीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर हे युद्ध समाप्त झाल्याचे घोषित करण्यात आले होते. यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विजय दिवसाच्या शुभेच्छा देत आपल्या सैनिकांच्या शौर्याला सलाम केला.
Vijay Diwas : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींनी शूरवीरांच्या शौर्याला केला सलाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 12:21 PM