नवी दिल्ली:भारत आणि चीनमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिकच ताणले गेले. यानंतर आता चीनने डाव्या नेत्यांच्या माध्यमातून भारतविरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असा मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. (vijay gokhale claims in his book that china tried to use left to scuttle n deal indo us nuclear deal)
रेल्वेचे कन्फर्म रिझर्व्हेशन मिळाले नाही, तर प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास करणे शक्य?
भारताचे सेवानिवृत्त परराष्ट्र सचिव विजय गोखले यांचे ‘द लाँग गेम : हाऊ द चायनिज निगोशिएट विथ इंडिया’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून, यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात २००७-०९ या काळात गोखले अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. भारत अमेरिका यांच्यात २००७-०८ मध्ये करण्यात आलेला अणु करार रोखण्यासाठी चीनने भारतातील डाव्यांना हाताशी धरले होते. तसेच भारतातील डाव्या नेत्यांच्या माध्यमातून चीनने देशात विरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असा खळबळजनक दावा विजय गोखले यांनी केला आहे.
संघर्ष वाढणार? दिल्लीतील आमदारांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला; ‘आप’ला धक्का!
भारत-अमेरिका अणु करारात चीनकडून हस्तक्षेप
भारतातील राजकारणात चीन सक्रिय झाल्याचे बहुतेक हे पहिले उदाहरण असावे. चीनने भारतातील डाव्या पक्षांशी असलेल्या जवळच्या संबंधाचा वापर केला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माक्सर्वादी) या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेते बैठक वा उपचारासाठी चीनला जातील. सीमावाद आणि द्विपक्षीय संबंधासह अन्य मुद्द्यांवर दोन्ही पक्षांची भूमिका राष्ट्रवादी होती. पण, चीनला भारत-अमेरिका यांच्यात होणाऱ्या अणु कराराची चिंता सतावत होती. त्यामुळे भारत-अमेरिका अणु करारात चीनकडून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट गोखले यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
Vi मोजतंय अखेरच्या घटका! बिर्ला यांची मोठी ऑफर; सरकारच्या ताब्यात जाणार कंपनी?
भारतीय अमेरिकेकडे झुकण्याची चीनला भीती
डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये डाव्यांच्या किती प्रभाव आहे, याविषयी चीनला कल्पना होती आणि भारतीय अमेरिकेकडे झुकतील या भीतीवर चीनने खेळी केली. हे करताना स्वतः पडद्यामागे राहू अशी खबरदारी चीनने घेतली, असा मोठा दावाही विजय गोखले यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.