ऑनलाइन लोकमत
मोनाको, दि. 31 - आयपीएलच्या नवव्या पर्वातील रॉयल चॅलेंजर बंगळुरु आणि सनराइझर्स हैदराबाद यांच्यातील अंतिम सामन्याच्यावेळी मद्यसम्राट विजय माल्या आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ माल्या यांनी रॉयल चॅलेंजर बंगळुरु संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल होताना दिसत आहे.
गेल्या रविवारी लंडन येथील फॉर्म्युला वन मोनाको लीगच्या दरम्यान विजय माल्या आणि सिद्धार्थ माल्या यांच्यासह काहीजण रॉयल चॅलेंजर बंगळुरु आणि हैदराबाद सनरायर्झ यांच्यातील अंतिम सामना पाहत होते. त्यावेळी सिद्धार्थ माल्याने एक व्हिडिओ तयार केला असून त्यामध्ये त्यांने बंगळुरु संघ आत्तापर्यंतच्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये तिस-यांदा पोहचला आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर बंगळुरुच्या विजयासाठी आम्ही खूप आतूर आहेत. आमच्याकडून रॉयल चॅलेंजर बंगळुरुला शुभेच्छा आहेत, असे म्हटले त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आयपीएलच्या अंतिम सामन्यात फलंदाजांनी केलेल्या तुफानी हल्ल्यानंतर गोलंदाजांच्या अप्रतिम माऱ्याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या नवव्या सत्राचे दिमाखात विजेतेपद पटकावताना बलाढ्य रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ८ धावांनी लोळवत त्यांचे विजेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळविले.
सध्या विजय माल्यांनी देशातून पलायन केले असून त्यांच्यावर देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचा आरोप आहे.