शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

विजय माल्ल्या यांना दुहेरी दणका; कर्ज बुडविणे भोवले

By admin | Published: March 08, 2016 2:32 AM

आता बंद झालेली किंगफिशर एअरलाइन्स आणि युनायटेड स्पिरिट्स या आघाडीच्या मद्यनिर्मिती कंपनीच्या नावे सार्वजनिक बँकांकडून हजारो कोटी रुपयांची कर्जे घेऊन ती चुकती न करण्यामुळे

बेंगळुरु/ मुंबई : आता बंद झालेली किंगफिशर एअरलाइन्स आणि युनायटेड स्पिरिट्स या आघाडीच्या मद्यनिर्मिती कंपनीच्या नावे सार्वजनिक बँकांकडून हजारो कोटी रुपयांची कर्जे घेऊन ती चुकती न करण्यामुळे उद्योगपती विजय माल्ल्या यांना सोमवारी स्वतंत्र प्रकरणांत दोन दणके मिळाले. गेल्या महिन्यात लंडनमधील दिएगो उद्योगसमुहासोबत झालेल्या समझोत्यानुसार माल्ल्यांना मिळणार असलेल्या ७५ दशलक्ष डॉलरच्या (सुमारे ५१५ कोटी रुपये) रकमेवर बेंगळुरु येथील कर्ज वसुली न्यायाधिकरणाने तात्पुरती टाच आणली. तर दुसरीकडे आयडीबीआय बँकेचे सुमारे ९०० कोटी रुपयांचे कर्ज बुजविल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माल्ल्या यांच्याविरुद्ध ‘मनी लॉड्रिंग’चा खटला दाखल केला.स्टेट बँक आॅफ इंडियासह १७ सार्वजनिक बँकांनी मिळून माल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेले ७,८०० कोटी रुपयांचे कर्ज जानेवारी २०१२ पासून थकित आहे. माल्ल्या यांना ‘कर्जबुडवे’ म्हणून जाहीर केल्यानंतर या कर्जाच्या वसुलीसाठी स्टेट बँकेने गेल्या महिन्यात दावाही दाखल केला होता.माल्ल्या यांची युनायटेड स्पिरिट््स ही कंपनी आता ब्रिटनच्या दिएगो उद्योगसमुहाने घेतली आहे. त्यासंदर्भात दिएगोसोबत झालेल्या समझोत्यानुसार माल्ल्या यांनी युनायटेड स्पिरिट््स कंपनीच्या चेअरमन पदावरून पायउतार व्हायचे व त्याबदल्यात दिएगोने त्यांना ७५ दशलक्ष डॉलर द्यायचे असे ठरले होते. आमच्या बुडित कर्जाचे प्रकरण मिटेपर्यंत माल्ल्यांना दिएगोकडून ही रक्कम मिळणे रोखावे, असा अर्ज स्टेट बँकेने केला होता. त्यावर कर्ज वसुली न्यायाधिकरणाने मल्ल्यांना पैसे देण्यास दिएगोला तात्पुरती मनाई केली व पुढील सुनावणी २८ मार्च रोजी ठेवली. दुसऱ्या प्रकरणात आयडीबीआय बँकेकडून घेतलेले ९०० कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याच्या संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मद्यसम्राट विजय माल्या आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने गेल्या वर्षी कर्ज थकविल्याच्या आरोपात एफआयआर दाखल केला होता. आता त्याच एफआयआरच्या आधारावर ईडीने माल्या व इतरांविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत नुकताच गुन्हा दाखल केला, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ईडीच्या मुंबईतील क्षेत्रीय कार्यालयाने हा गुन्हा दाखल केलेला असला तरी सीबीआयचे अधिकारी बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सच्या आर्थिक संरचनेचा तपास करीत आहेत आणि विदेश चलन कायद्याचे उल्लंघन केल्याच्या संदर्भातही स्वतंत्र चौकशी केली जाण्याची शक्यता आहे, असे या सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)> चौकशीसाठी बोलावणार ‘माल्या आणि अन्य लोकांना लवकरच चौकशीसाठी बोलावण्यात येईल. तपास संस्थेने संबंधित अधिकारी आणि बँकेकडून आवश्यक ते दस्तऐवज गोळा केलेले आहेत,’ असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. याआधी सीबीआयने किंगफिशर एअरलाईन्सचे संचालक विजय माल्या, कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी ए. रघुनाथन आणि आयडीबीआयच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. कर्ज मर्यादेबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवून किंगफिशर एयरलाईन्सला कर्ज मंजूर करण्यात आल्याचा आरोप या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.