ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बूडवून देशाबाहेर पसार झालेला विजय माल्या याच्या विरुद्ध काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी माल्याला एकूण संपत्ती जाहीर करण्याचे आदेश दिले होते. भारतातून फरार असलेल्या माल्याने आपली संपत्ती जाहिर केली ती पाहून तुम्ही चकित व्हाल.
विजय माल्याने न्यायालयात जाहीर केलेल्या विवरणात मार्च 2016 पर्यंत त्याच्या जवळ रोख रक्कम फक्त 16440 रुपये असल्याचे सांगितले आहे. बँकमध्ये असलेल्या करंट, सेविगं आणि फिक्स डिपॉजिट खात्यामधील 12,62,88468 रुपये आयकर विभागाने जप्त केले आहेत. परदेशात असलेले 5.62 मिलियन अमेरिकन डॉलर बाबत माल्याने कोणतीही माहिती दिली नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.