ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - एप्रिल 9 पूर्वी चौकशीसाठी हजर व्हा असं समन्स नव्याने सक्तवसुली संचालनालयाने विजय मल्ल्यांविरोधात बजावल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. याआधी एप्रिल 2 रोजी मल्ल्यांनी हजर होणे अपेक्षित होते. मात्र विजय मल्ल्यांनी आत्ता हजर होणे शक्य नसून मे पर्यंत मुदत द्यावी अशी मागणी केली होती.
अनेक सरकारी बँकांची कर्जे विजय मल्ल्या प्रमुख असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सने थकवली असून ही रक्कम हजारो कोटींच्या घरात आहे. दोन दिवसांपूर्वी मल्ल्या यांनी चार हजार कोटी रुपये येत्या काही महिन्यांमध्ये देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, यास बँकांनी सहमती अद्याप तरी दर्शवलेली नाही.
आर्थिक अफरातफरीप्रकरणी विजय मल्ल्यांची चौकसी सक्तवसुली संचालनालय करत असून विजय मल्ल्या अटक होण्याच्या भीतीने विदेशात पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता 9 एप्रिल रोजी हजर राहण्याचं फर्मान निघाल्यावर मल्ल्या काय करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
My son Sid does not deserve all this hatred and abuse. He has had nothing to do with my business. Shower abuse on me if you must but not him— Vijay Mallya (@TheVijayMallya) March 29, 2016