अहमदाबाद - गुजरातमध्ये भाजपानं सलग सहाव्यांदा सत्ता स्थापन केली आहे. मंगळवारी (26 डिसेंबर) विजय रुपाणी यांनी गांधीनगर येथे दुस-यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गुजरातमधील भाजपा सरकारचा शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासहीत भाजपा व ‘रालोआ’ घटकपक्षांचे 18 मुख्यमंत्री उपस्थित होतेरुपाणी यांच्या नवीन मंत्रिमंडळात जुन्या तसंच नवीन चेह-यांसहीत 20 जणांना संधी देण्यात आली आहे.
विजय रुपाणी यांनी दुस-यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथगुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विजय रुपाणी यांनी शपथ घेतली आहे. रुपाणी यांनी दुस-यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. 2006-2012 या कालावधीदरम्यान ते राज्यसभेचे सदस्य होते
उपमुख्यमंत्री नितिन पटेलनितीन पटेल यांनी गुजरातच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान मोदी यांचे विश्वासू तसेच ते पाटीदार समुदायातील नेते आहेत. नितीन पटेलदेखील दुस-यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.
कोणी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ?नितिन पटेल (उपमुख्यमंत्री) आणि कॅबिनेट मंत्री म्हणून भुपेन्द्रसिंह चुडासमा, आरसी फालदू, कौशिक पटेल, सौरभ पटेल, गनपत वसावा, जयेश रादडिया, दिलीप ठाकोर आणि ईश्वर भाई परमार यांनी घेतली शपथ
कोणी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ?रूपाणी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून प्रदीप सिंह जडेजा, जयद्रथ सिंह परमार, पत्रकार रमनलाल नानुभाई, पुरषोत्तम सोलंकी, ईश्वर सिंह पटेल, अहिरभाई, किशोर कनानी, बचू भाई खाबड आणि देवा विधावरी घेतली शपथ
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने १८२ सदस्यीय सभागृहात ९९ जागा जिंकून बहुमत मिळविले आहे.