"भाजप-संघाच्या सर्व्हेमध्ये काँग्रेस विजयी झाल्यानं विजय रुपाणींचं मुख्यमंत्रिपद गेलं"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 11:23 PM2021-09-11T23:23:42+5:302021-09-11T23:27:40+5:30
विजय रुपाणींनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; पुढील मुख्यमंत्री उद्या ठरणार
अहमदाबाद: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्षांसह दोन मंत्र्यांची नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. भाजप पुन्हा एकदा निवडणुकीच्या काही महिने आधी मुख्यमंत्री बदलणार आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपनं उत्तराखंडचे मुख्यमंत्री बदलले. त्याचा फायदा भाजपला होत असल्याचं निवडणुकीआधीच्या सर्वेक्षणात दिसून आलं आहे. त्यामुळे आता गुजरातमध्ये काय होणार याची उत्सुकता आहे.
कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेलं अपयश, पाटीदारांची नाराजी, बेरोजगारी यामुळे रुपाणी यांना राजीनामा द्यावा लागल्याचं बोललं जात आहे. या निर्णयाची तयारी भाजपनं आधीपासूनच केल्याचं सांगितलं जात आहे. भाजप अशाप्रकारचे प्रयोग करत आला आहे, वेळोवेळी नेतृत्त्व बदल गरजेचा आहे, असं भाजप नेते पुरुषोत्तम रुपाला यांनी म्हटलं होतं.
मुख्यमंत्री रूपानी को बदलने का प्रमुख कारण!!
— Hardik Patel (@HardikPatel_) September 11, 2021
अगस्त में आरएसएस और भाजपा का गुप्त सर्वे चौंकाने वाला था। कांग्रेस को 43% वोट और 96-100 सीट, भाजपा को 38% वोट और 80-84 सीट, आप को 3% वोट और 0 सीट, मीम को 1% वोट और 0 सीट और सभी निर्दलीय को 15% वोट और 4 सीट मिल रही थी।
काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांचा दावा
गुजरात सरकार उत्तम काम करत होतं, तर मग रुपाणी यांना का हटवण्यात आलं, असा प्रश्न विरोधकांना उपस्थित करण्यात येत आहे. काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी भाजप-संघाच्या सर्वेक्षणानंतर रुपाणी यांना डच्चू देण्यात आल्याचा दावा केला. 'ऑगस्टमध्ये आरएसएस आणि भाजपनं एक गुप्त सर्वेक्षण केलं. त्यातून आश्चर्यजनक आकडे समोर आले. काँग्रेसला ४३ टक्के मतासंह ९६ ते १००, भाजपला ३८ टक्के मतांसह ८० ते ८४, आपला ३ टक्के मतांसह शून्य, एमआयएमला १ टक्के मतासह शून्य आणि अपक्षांना १५ टक्क्यांसह ४ जागा मिळत असल्याची आकडेवारी पुढे आले,' असं पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.