'मुस्लिमांना जाण्यासाठी 150 देश, हिंदुंसाठी फक्त भारतच': गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 12:28 PM2019-12-25T12:28:04+5:302019-12-25T12:29:44+5:30

महात्मा गांधींच्या तत्त्वांना मानणारे काँग्रेसचे नेते नागरिकत्व कायद्याला विरोध का करत आहे, याचा खुलासा त्यांनी करावा असा टोला रूपाणींनी लगावला.

vijay rupani says india is the only country in the world for hindus | 'मुस्लिमांना जाण्यासाठी 150 देश, हिंदुंसाठी फक्त भारतच': गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

'मुस्लिमांना जाण्यासाठी 150 देश, हिंदुंसाठी फक्त भारतच': गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

Next

गुजरात: साबरमती आश्रमाबाहेर नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ भाजपकडून काढण्यात आलेल्या रॅलीत भाषण करताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. जगभरात मुस्लिमांसाठी 150 इस्लामिक देश आहेत. त्यामुळे ते यातील कोणताही देश निवडू शकतात, पण हिंदुंसाठी फक्त भारतच एकमेव देश आहे असं वक्तव्य रूपाणी यांनी केले आहे.

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ मंगळवारी अहमदाबादेत काढण्यात आलेल्या रॅलीत बोलताना त्यांनी नागरिकत्व कायद्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. महात्मा गांधींच्या तत्त्वांना मानणारे काँग्रेसचे नेते नागरिकत्व कायद्याला विरोध का करत आहे, याचा खुलासा त्यांनी करावा असा टोला रूपाणींनी लगावला. तर मुस्लिमांसाठी जगात 150 इस्लामिक देश आहेत. ते कोणताही देश निवडू शकतात पण हिंदुंसाठी फक्त भारतच एकमेव देश आहे, तरीही काँग्रेसला त्रास होत असल्याचे सुद्धा रूपाणी म्हणाले.

पीडित हिंदुना शरणार्थीं ठेवण्यासाठी संपूर्ण देश या कायद्याचे स्वागत करत आहे, मात्र काँग्रेसला व्होट बँकच्या भीती वाटत आहे. पाकिस्तानसह इतर देशांतील बहुतेक हिंदू शरणार्थी अनुसूचित जातीतील असून त्यांचा काँग्रेसकडून विरोध केला जात आहे. तर घुसखोरी आणि दहशतवादी घटकांना देशातून हद्दपार करण्यासाठी एनआरसी हा कायदा आहे. मात्र या विषयी काँग्रेस भारतातील विविध समाजात मतभेद पसरवून जातीय विष पेरण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी मुख्यमंत्री रूपाणी यांनी केले.

 

 

Web Title: vijay rupani says india is the only country in the world for hindus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.