लखनऊ - उत्तर प्रदेशात आठ पोलिसांची हत्या घडवणारा गँगस्टर विकास दुबे शुक्रवारी (10 जुलै) सकाळी एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. एन्काऊंटरमध्ये गंभीर जखमी झालेल्या दुबेला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. विकास दुबेला काल मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये अटक करण्यात आली. आज त्याला कानपूरला नेलं जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. यानंतर विकास दुबेनं पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाल्याची माहिती मिळत आहे. महाकाल मंदिरात दुबेला कशी अटक केली याची माहिती आता समोर आली आहे.
महाकाल मंदिराच्या सुरक्षा अधिकारी रुबी यादव यांनी विकास दुबेच्या मुसक्या आवळल्या. एका हिंदी वृत्तवाहिनीला त्यांनी नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे. "सकाळी 7.15 च्या सुमारास टीम राऊंडवर असताना विकास दुबेसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीला फुलवाल्याने पाहिले. त्याने याबाबतची माहिती आमच्या टीमला दिली. त्यानंतर मी माझ्या टीमला सांगितले जोपर्यंत खात्री पटत नाही तोपर्यंत पकडायचे नाही. तो बाहेर फिरत होता, काहीही करू शकला असता. आमची टीम त्याच्या मागे होती. त्याने 250 रुपयांचे तिकीट घेतले आणि शंख गेटने प्रवेश केला, तोपर्यंत टीमने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती" अशी माहिती यादव यांनी दिली आहे.
"मी माझ्या सुरक्षा रक्षकाला विकास दुबेचा एक फोटो पाठविण्यास सांगितले. माझ्याकडे आलेल्या फोटोमध्ये त्याचा चेहरा वेगळा होता. त्याने आपले केस लहान केले होते, चष्मा आणि मास्क लावला होता. शिवाय तो बारीकही दिसत होता. त्यामुळे त्याचा चेहरा पाहून ओळखणे कठीण झाले होते. टीमला त्याच्याकडे लक्ष ठेवायला सांगितले. त्याने दर्शन घेतले त्यावेळास गुगल करुन त्याचे फोटो तपासून घेतले. गुगल सर्चमधील फोटोच्या डोक्यावर डाग होता. जेव्हा माझ्या गार्डने पाठविलेले फोटो मी पाहिले तेव्हा मी झूम करुन पाहिले तर त्याच्याही कपाळावर जखम होती. यानंतर मला खात्री झाली की हा विकास दुबे आहे. परंतु कोणीही पॅनिक होऊ नये म्हणून मी ही गोष्ट माझ्या टीमला सांगितली नाही."
"मी एसपींना याबाबत फोन करून माहिती दिली. सुरक्षा रक्षकांना सांगितले की तुम्ही त्याला लाडूच्या काऊंटरवर बसा आणि त्याला पाहत आहोत याविषयी त्याला शंका येऊ देऊ नका. त्याला ओळखपत्राविषयी विचारा. नाव विचारले असता त्याने आपले नाव शुभम सांगितले आणि खिशातून ओळखपत्र काढलं. या ओळखपत्रावर त्याचे नाव नवीन पाल होते. तो बनावट ओळखपत्रावर फिरत होता. मंदिरमध्ये त्याने मी विकास दुबे असल्याने कबूल केले. त्याने एका सुरक्षा रक्षकाची नेम प्लेट काढली आणि त्याचं घड्याळही तोडलं. त्यानंतर एसपी आणि स्थानिक पोलीस आल्याने त्याला तातडीने अटक करण्यात आली" असा अटकेचा थरार रुबी यादव यांनी सांगितला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : MASK लावायचा कंटाळा येतो?, 'हा' Video पाहिलात तर कधीच हटवणार नाहीत मास्क
CoronaVirus News : हँड सॅनिटायझरची खरेदी करताना 'या' गोष्टी चेक करता का?; FDAने दिला मोलाचा सल्ला
शरद पवारांच्या 'मातोश्री' भेटीवरुन आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला, म्हणाले...
बापरे! पगार मागितला म्हणून मालकिणीने अंगावर सोडला कुत्रा, चेहऱ्यावर 15 टाके