नवी दिल्ली - आठ पोलिसांची हत्या घडवणारा गँगस्टर विकास दुबे शुक्रवारी (10 जुलै) सकाळी एन्काऊंटरमध्ये ठार झाला. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये विकास दुबेला गुरुवारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला कानपूरला नेलं जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. विकास दुबेने पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत दुबे ठार झाला. यानंतर आता याबाबत आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. चौकशी दरम्यान एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे.
उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या परिसरात विकास दुबेला अटक करण्यात आली. मात्र उज्जैनमध्ये दोन ते तीन दिवस राहण्याचा त्याचा प्लॅन असल्याची माहिती आता पोलिसांना मिळाली आहे. ज्या रिक्षाच्या मदतीने दुबे महाकाल मंदिरात पोहचल्या त्या रिक्षाचालकाने चौकशीदरम्यान पोलिसांना ही माहिती दिली आहे. पण दुबेचा उज्जैनमध्ये राहणाचा प्लॅन यशस्वी झाला नाही. कारण त्याआधीच मंदिर परिसरातून त्याला अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं.
रिक्षाचालक बंटी याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, विकास दुबे सकाळी जवळपास 3.55 वाजता राजस्थावरून आलेल्या बाबू ट्रॅव्हल्सच्या बसमधून उतरला होता. देवास गेट बस स्टँडवर झालवाडवरून आलेल्या या बसधून चार जण उतरले. त्यापैकी एक विकास दुबे होता. मात्र बंटीला याबाबत कोणतीही माहिती नव्हती. प्रवासादरम्यान दुबे याने रिक्षाचालकाला उज्जैनमध्ये दोन तीन दिवस राहण्याची व्यवस्था होऊ शकते का याबाबत विचारपूस केली होती. त्यावर रिक्षाचालकाने त्याला ओळखपत्र असल्यास तुम्ही राहू शकता असं सांगितलं होतं. त्यानंतर त्याला महाकाल मंदिरात जायचं असल्याने मंदिर परिसरात पोहचवलं.
Vikas Dubey Encounter : लेडी सिंघमने आवळल्या विकास दुबेच्या मुसक्या, जाणून घ्या नेमकं काय घडलं
विकास दुबे याचा दोन ते तीन दिवस उज्जैनमध्ये राहण्याचा प्लॅन असल्याची माहिती रिक्षाचालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीतून समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. महाकाल मंदिराच्या सुरक्षा अधिकारी रुबी यादव यांनी विकास दुबेच्या मुसक्या आवळल्या. उत्तर प्रदेशात आठ पोलिसांची हत्या घडवणारा गँगस्टर विकास दुबे शुक्रवारी (10 जुलै) सकाळी एन्काऊंटरमध्ये ठार झाला. एन्काऊंटरमध्ये गंभीर जखमी झालेल्या दुबेला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
महत्त्वाच्या बातम्या
Google भारतात 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार, सुंदर पिचाईंची मोठी घोषणा
Rajasthan Political Crisis : "राजस्थानमधील राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार"
CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी
CoronaVirus News : "कोरोनाच्या लढाईत सरकार फेल पण क्रेडिट चोरीत केजरीवाल अव्वल"
Rajasthan Political Crisis : "तबेल्यातून घोडे निघून गेल्यावर आपण जागे होणार आहोत का?"