विकास, जुमल्यांचे शाब्दिक फटाके, वाक्युद्धाची लड पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 05:33 AM2017-10-17T05:33:57+5:302017-10-17T05:34:41+5:30

सरदार वल्लभभाई पटेल व मोरारजी देसाई यांच्यासारख्या गुजरातमधील नायकांचा काँग्रेसने नेहमीच अपमान केला. गुजरात हे राज्य गांधी-नेहरू घराण्याच्या डोळ्यात सतत खुपत होते, असा आरोप करीत

 Vikas, Jumalya's literal fireworks, sound fight | विकास, जुमल्यांचे शाब्दिक फटाके, वाक्युद्धाची लड पेटली

विकास, जुमल्यांचे शाब्दिक फटाके, वाक्युद्धाची लड पेटली

Next

काँग्रेस आणि गांधी-नेहरू परिवाराला गुजरातविषयी कायमच राग - मोदी
गांधीनगर : सरदार वल्लभभाई पटेल व मोरारजी देसाई यांच्यासारख्या गुजरातमधील नायकांचा काँग्रेसने नेहमीच अपमान केला. गुजरात हे राज्य गांधी-नेहरू घराण्याच्या डोळ्यात सतत खुपत होते, असा आरोप करीत, काँग्रेसच्या मनात विकासाविषयी रागच आहे. मलाही त्यांनी तुरुंगात टाकण्याचा डाव आखला होता, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला. 

विकासासाठी निवडणूक : काँग्रेसने देशसेवेवर कधीही लक्ष दिले नाही. जातीयवाद वाढवणे आणि लोकांची दिशाभूल करणे हे काँग्रेसचे निवडणुकीतील मुख्य शस्त्र आहे. आम्हाला निवडणूक विकासासाठी लढवायची आहे, काँग्रेसला घराणेशाही हवी आहे, एका घराण्यासाठी सत्ता हवी आहे. हिंमत असेल तर काँग्रेसने विकासाच्या मुद्द्यावर गुजरातची निवडणूक लढवून दाखवावी.
काँग्रेसच्या नेत्यांचे सर्व लक्ष खोटे बोलण्यावर असते, गुजरातच्या विकासासंबंधी काँग्रेस नकारात्मक, घराणेशाही हरणार, विकासवाद जिंकणार, देशसेवेसाठी भाजपा कटिबद्ध.

आता सुरू होईल अनेक खोट्या घोषणांचा पाऊस - राहुल गांधी

नवी दिल्ली : गुजरातमध्ये सोमवारी होईल घोषणा आणि खोट्या आश्वासनांचा (जुमलों की बारीश) पाऊस..! असा आहे गुजरातमध्ये होणा-या आगामी निवडणुकीपूर्वीचा आजचा हवामानाचा अंदाज.!! अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौ-यापूर्वी निशाणा साधला.

जुमलों की बारीश :राहुल गांधी यांनी त्याआधीच टिष्ट्वटरवर ‘जुमलों की बारीश’ असा शब्दप्रयोग करून टीका केली. सोबत त्यांनी एक बातमी जोडली. त्या बातमीत म्हटले आहे की, निवडणुकीच्या तारखेसोबत गुजरात जवळपास १२,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या प्रतीक्षेत आहे.
गुजरात निवडणुकीची अद्याप घोषणा केलेली नाही, त्यावरूनही विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Web Title:  Vikas, Jumalya's literal fireworks, sound fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.