गेल्या 30-35 वर्षांपासून कमलाथल अम्मा (वय 85) केवळ 1 रुपयात इडली विकून लोकांचे पोट भरत आहे. इतकेच नव्हे तर तामिळनाडूच्या या अम्मांनी लॉकडाऊनमध्येही इडलीच्या किमती वाढविल्या नाहीत. त्या दररोज उत्साहात लोकांना इडली पोहोचवतात आणि त्यांना खायला घालतात. अम्मांना असं वाटतं की, कोणताही माणूस भुकेलेला राहू नये.जेव्हा सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना यांना अम्माच्या या उदात्तकार्याची माहिती मिळाली, त्यानंतर विकास खन्ना यांनी ट्विटरद्वारे कमलाथल अम्माबद्दल माहिती गोळा केली. विकास खन्ना यांनी ट्विटरवर कोइम्बतूरमधील कमलाथल अम्मांची कुणी मला माहिती देऊ शकेल का, असं आवाहन केलं, त्यालाही अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला. माझ्याकडे 350 किलो तांदूळ आहे. कोणीतरी त्यांच्याशी समन्वय साधण्यास मदत करावी. खरं तर विकास खन्नाला अम्माकडे 350 किलो तांदूळ पोहोचवायचे होते.विकास खन्ना यांच्या ट्विटनंतर अनेक लोक त्यांची मदत करण्यासाठी पुढे आले आणि शेफ यांना अम्मांपर्यंत तांदूळ पोहोचवता आले. विकास खन्ना एका ट्विटमध्ये लिहितात, आज आम्ही त्यांना आश्चर्यचकित केले. मदर्स डे च्या शुभेच्छा
अन्य महत्त्वाच्या बातम्या
गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाक राबवत असलेल्या योजनांना भारताचा विरोध; इम्रान सरकारला दिला गंभीर इशारा
Lockdown 4.0चं काऊंटडाऊन; आपल्या राज्याला कुठल्या सवलती मिळणार?
CoronaVirus news : कोरोनाच्या समूह संसर्गाची भीती, लॉकडाऊन हटवणं पडू शकतं महागात- तज्ज्ञ
अमेरिका मैत्रीला जागला! भारताला व्हेंटिलेटर देणार अन् मिळून कोरोनाला हरवणार
प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक, 24 जणांचा मृत्यू
...म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे, शिवसेनेचा भाजपाला टोला